उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर जिल्ह्यात बायकोकडून नवऱ्याची हत्या
बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने कट रचून हत्या केल्याचा आरोप
पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली
घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले
उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये एका महिलेने नवऱ्याची निर्घृण हत्या केली. शरीरसंबंध ठेवताना या महिलेने नवऱ्याचा चाकूने गळा चिरला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेच्या नवऱ्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी महिलेने नवऱ्याच्या मृतदेहाजवळ बॉयफ्रेंडसोबत शरीरसंबंध ठेवले. या महिलेचा बॉयफ्रेंड नात्याने तिचा भाचा लागतो. या हत्याकांडानंतर महिलेने नवऱ्याच्या हत्येचे संपूर्ण खापर बॉयफ्रेंडवर फोडले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जानेवारीला भटपुरा चंदू गावात ही घटना घडली. या ठिकाणी राहणाऱ्या बलरामची बायको भाच्याच्या प्रेमात वेडी झाली होती. जेव्हा बलरामला बायकोच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली तर त्याने तिला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटत राहिली. त्यानंतर बलरामच्या बायकोने आणि तिच्या बॉयफ्रेंडने त्याची हत्या करण्याचा कट रचला.
२८ जानेवारीला सकाळी साडेसात वाजता बलराम झोपेतून उठला. त्यावेळी त्याची बायको आणि तिचा बॉयफ्रेंड त्याठिकाणी होते. महिलेने आधी बलरामसोबत शरीरसंबंध ठेवत त्याचा गळा चिरला. तिने बॉयफ्रेंड आणि त्याच्या एका मित्राच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली. त्यानंतर नवऱ्याच्या मृतदेहाजवळच असलेल्या खाटेवर तिने बॉयफ्रेंडसोबत शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर तिने हत्येचे खापर बॉयफ्रेंडवर फोडले.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा बलरामची बायको त्याच्या मृतदेहाजवळ रडत बसली होती. महिलेचा बॉयफ्रेंड आणि त्याचा आणखी एक मित्र घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी महिलेची कसून चौकशी केली तेव्हा तिने हत्येची कबुली दिली. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. पोलिस सध्या आरोपींची चौकशी करत आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.