Crime News : संधी साधून तो थेट मुलीच्या घरात शिरला अन्...; ऑनलाईन गेममधील मैत्रीचं भयानक वास्तव आलं समोर
Ahmedabad Crime NewsSaam Tv

Crime News : संधी साधून तो थेट मुलीच्या घरात शिरला अन्...; ऑनलाईन गेममधील मैत्रीचं भयानक वास्तव आलं समोर

Ahmedabad Crime News : अहमदाबादमध्ये ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म फ्री फायरद्वारे ओळख वाढवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी अटकेत असून पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on
Summary
  • ऑनलाईन गेमिंगद्वारे ओळख झाली

  • तरुणाने थेट मुलीच्या घरी घुसून मुलीवर बलात्कार केला

  • आरोपीने मुलीला अपहरण करून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला

  • पोलिसांनी केली अटक

अहमदाबादमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अपहरण करून तिच्यावर २२ वर्षाच्या एका तरुणाने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. शिवाय तरुणीला देखील आरोपीच्या तावडीतून सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचा आणि आरोपीची ओळख ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म फ्री फायरद्वारे झाली होती. या दोघांमध्ये वारंवार बोलणं होत होतं. त्यानंतर २२ जानेवारी रोजी आरोपी पश्चिम बंगालहून अहमदाबादला आला आणि पीडितेला घरी एकटी पाहून तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी, त्याने तिला त्याच्या मूळ गावी घेऊन जाण्याच्या उद्देशाने आमिष दाखवले आणि तिचे अपहरण करून घेऊन गेला.

Crime News : संधी साधून तो थेट मुलीच्या घरात शिरला अन्...; ऑनलाईन गेममधील मैत्रीचं भयानक वास्तव आलं समोर
Online Shopping Fraud : स्वस्त साडी घेणं महागात पडलं! भुलथापांना बळी पडली अन् खातं रिकामं झालं, तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

पीडित मुलीच्या कुटुंबाने ती बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यानंतर, वेजलपूर पोलिसांनी तिच्या फोन लोकेशनचा वापर करून तिचा शोध घेतला. रेल्वे पोलिसांशी समन्वय साधून अधिकाऱ्यांनी खरगपूर येथे ट्रेन अडवली, अल्पवयीन मुलीची सुटका केली आणि आरोपीला अटक केली.

Crime News : संधी साधून तो थेट मुलीच्या घरात शिरला अन्...; ऑनलाईन गेममधील मैत्रीचं भयानक वास्तव आलं समोर
Shocking : स्टॅमिनाच्या गोळ्या खायचा, रात्री अगणित छळ करायचा... वैतागलेल्या बायकोनं नवऱ्यासोबत असं काही केलं की हादरून जाल!

तपासात असे दिसून आले की, आरोपीने यापूर्वीही अहमदाबादला भेट दिली होती आणि या घटनेपूर्वी त्याने मुलीवर दोनदा अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, मुलीला तिच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहे. वेजलपूर पोलिसांनी बीएनएस आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com