Online Shopping Fraud : स्वस्त साडी घेणं महागात पडलं! भुलथापांना बळी पडली अन् खातं रिकामं झालं, तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

Mumbai Online Shopping Fraud News : इंस्टाग्रामवरील बनावट ‘झारा फॅशन’ पेजवरून साडी खरेदी करताना मुंबईतील तरुणीची ६ हजार रुपयांची फसवणूक झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Online Shopping Fraud : स्वस्त साडी घेणं महागात पडलं! भुलथापांना बळी पडली अन् खातं रिकामं झालं, तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Online Shopping Fraud NewsSaam Tv
Published On
Summary
  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरील बनावट ब्रँड पेजवरून तरुणीची फसवणूक

  • साडी खरेदीच्या नावाखाली ६ हजार रुपये उकळले

  • फेक व्हिडिओ आणि खोट्या मेसेजद्वारे विश्वास संपादन

  • पोलिसांकडून गुन्हा दाखल; सायबर तपास सुरू

सोशल मीडिया हे फक्त मनोरंजनाचे साधन नसून त्यावर अनेक व्यावसायिक मार्केटिंग साठी देखील त्याचा वापर करतात. या डिजिटल मार्केटिंगद्वारे ग्राहकांना आकर्षित करतात. मात्र काही जण याचा दुरूपयोग देखील करतात. सोशल मीडियावर नामांकित ब्रँडच्या नावाचे फेक अकाऊंट सुरू करून ग्राहकांची दिशाभूल करत त्यांना लुबाडतात. अशीच एक घटना मुंबईतील एका तरुणीसोबत घडली आहे. नामांकित ब्रँडच्या नावाखाली सोशल मीडियावर सुरू असलेल्या एका इंस्टाग्राम पेज वरून तरुणीने ऑनलाईन शॉपिंग केली. मात्र तिच्याकडून हजारो रुपये उकळण्यात आले आहेत. या घटनेची सविस्तर माहिती तिने सोशल मीडियावर शेअर देखील केली आहे.

व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, मुंबईतील एका तरुणीने इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'झारा फॅशन' नावाने सुरु असलेल्या एका कंपनीच्या व्हिडिओ पाहून साडी विकत घेण्याचे ठरवले. कंपनीच्या इंस्टाग्राम पेजवर जाऊन तिने साडी बुक केली. साडीची किंमत १५०० सांगण्यात आली. मात्र बनावट कंपनीकडून या तरुणीला १९२० रुपये पाठवण्याचा मेसेज आला. या मेसेज मध्ये असे म्हटले होते की, तुमची पहिली ऑर्डर असल्याने ट्रेकिंग उपलब्धतेसाठी तुम्हाला १९०० आणि २० रुपये असे वेगवगेळ्या स्वरूपात पाठवावे लागतील. हे पैसे तुम्हाला रिफंड दिले जातील. तरुणीचा विश्वास संपादन झाल्याने तिने कंपनीला पैसे पाठवले.

Online Shopping Fraud : स्वस्त साडी घेणं महागात पडलं! भुलथापांना बळी पडली अन् खातं रिकामं झालं, तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
Pune Water Shortage : पुण्यात पाणीबाणी! पुढील १० दिवस शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत, कोणत्या भागावर होणार परिणाम? वाचा A टू Z माहिती

त्यानंतर या बनावट कंपनीने तरुणीला फोन करून सांगितले की, तुमचे पैसे आमच्या खात्यात जमा झालेले नाहीत. त्यानुसार कंपनीने बनावट व्हिडिओ देखील पाठवला. शिवाय रिफंड करण्यासाठी आणखी ४११६ रुपये पाठवा असे देखील कंपनीने सांगितले. मात्र तरुणीने नकार दिल्यानंतर तिचा फोन नंबर ब्लॉक करण्यात आला.

शिवाय तिच्या खात्यातील ६ हजार रुपये गेले असल्याची माहिती आहे. आपली फसवणूक झाली असल्याचं समजताच तरुणीने जवळच्या विरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी संबंधित बनावट कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला असून तरुणीला पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. पोलीस तपासात हे कनेक्शन गुजरातमधून समोर आलं आहे. दरम्यान तुम्ही देखील अशा प्रकारच्या बनावट ऑनलाईन कंपनीकडून खरेदी करताना सावधता बाळगा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com