Shocking: महिला नेत्याचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह, बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

AAP woman leader death: आम आदमी पार्टीच्या महिला नेत्याचा घरामध्ये संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. गुजरातच्या राजकोटमधील ही घटना आहे. बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप केला जात आहे.
Shocking: महिला नेत्याचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह, बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ
AAP woman leader deathSaam Tv
Published On
  • आपच्या महिला नेत्या नंदिनी बोसमिया यांचा संशयास्पद मृत्यू झाला.

  • राजकोटमध्ये घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.

  • कुटुंबीयांनी बॉयफ्रेंड अस्लम हुसेनवर हत्येचा आरोप केला.

  • या प्रकरणामुळे गुजरातच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

गुजरातच्या राजकोटमध्ये आपच्या महिला नेत्याचा घरामध्ये संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. नंदिनी बोसमिया (२३ वर्षे) असं या आपच्या महिला नेत्याचे नाव होते. घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत अवस्थेत आपची महिला नेता आढळून आली. कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना खाली उतरवत रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत उशिरा झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषीत केले. या महिला नेत्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्या बॉयफ्रेंडवर हत्या केल्याचा आरोप केला आहे. नंदिनी यांनी आपच्या तिकीटावर जेतपूर-नवागड नगरपालिका निवडणूक लढवली होती.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, नंदिनी यांच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, नंदिनी जुनागढ येथील विवाहित अस्लम हुसेन समासोबत लिव्ह इनमध्ये राहत होत्या. अस्लम हुसेन समाने नंदिनीचा छळ केला आणि तिच्यावर हल्ला केला. त्यानेच तिला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास भाग पाडले. अस्लमने नंदिनी बोसमियाला धमकी दिली होती आणि त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. आता, नंदिनी बोसमियाच्या कुटुंबीयांकडून झालेल्या खळबळजनक आरोपांनंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे.

Shocking: महिला नेत्याचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह, बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ
Crime: दुचाकीला कट मारल्याचा राग डोक्यात गेला, तरुणाला दगड अन् लोखंडी रॉडने हात-पाय तुटेपर्यंत मारहाण

वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, नंदिनी जुनागढमध्ये अस्लमच्या घरी भाड्याने राहत असताना त्या दोघांची भेट झाली. नंतर, नंदिनी आणि अस्लम यांचे नाते राजकोटमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये बदलले. नंदिनीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, गेल्या काही महिन्यांत त्यांच्या नात्यात कटुता आली होती. अस्लमने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता आणि त्याचे नंदिनीसोबत प्रेमसंबंध कायम होते.

Shocking: महिला नेत्याचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह, बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ
Delhi Crime: दिल्ली हादरली! १० वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह जंगलात नेऊन फेकला

नंदिनी आणि अस्लम यांच्यात अनेकदा भांडणे होत होती. नंदिनीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अस्लम नंदिनीला मारहाण देखील करत होता. ती २३ वर्षांची होती. सततच्या भांडणामुळे नंदिनीने ते अपार्टमेंट सोडले होते. ती नातेवाईकाच्या घरी राहत होती. पण काही दिवसांपूर्वी ती अस्लमकडे परत गेली होती. अस्लमच्या नातेवाईकांनी याआधी नंदिनीवर हल्ला केला होता आणि तिचा छळ केला होता असा आरोप केला आहे. अस्लमने नंदिनीची हत्या करून तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवला असल्याचा आरोप नंदिनीच्या कुटुंबीयांनी केला.

Shocking: महिला नेत्याचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह, बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ
Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, झोपेत असताना डोक्यात सिलिंडर टाकला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com