मोठी बातमी! भाजपच्या वरिष्ठ महिला नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Former Municipal Chairperson Farrukhabad Death News: भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि फर्रुखाबादच्या माजी पालिका अध्यक्षा डॉ. रजनी सरीन यांचे ७७ व्या वर्षी निधन झाले. ब्रेन ट्यूमरमुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
Dr. Rajni Sareen, senior BJP leader and former Farrukhabad Municipal Chairperson, passed away at the age of 77.
Dr. Rajni Sareen, senior BJP leader and former Farrukhabad Municipal Chairperson, passed away at the age of 77.saam tv
Published On

फर्रुखाबादमध्ये वरिष्ठ भाजप नेत्या, माजी पालिका अध्यक्षा आणि समाजसेविका डॉ. रजनी सरीन यांचे रविवारी दि (7) सायंकाळी निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. लोहाई रोड येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भाजप कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि शहरातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. रजनी सरीन या मागच्या अनेक दिवसांपासून ब्रेन ट्यूमरने त्रस्त होत्या. महिनाभरापूर्वी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र रविवारी सायंकाळी अचानक प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाले.

Dr. Rajni Sareen, senior BJP leader and former Farrukhabad Municipal Chairperson, passed away at the age of 77.
Accident News : भरधाव बस काळ बनून आली, रिक्षाला १०० मीटरपर्यंत फरफटत नेले; देवदर्शनाला जाणाऱ्या एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

भाजपमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

डॉ. सरीन या भाजपच्या वरिष्ठ नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी पक्षात प्रदेश मंत्री तसेच राष्ट्रीय परिषद सदस्य अशी महत्त्वाची पदे भूषवली होती. संघटन आणि जनसेवा क्षेत्रातील त्यांच्या सक्रिय कार्यामुळे त्यांना चांगली ओळख मिळाली होती.

१९९९ मध्ये बनल्या होत्या पालिका अध्यक्षा

डॉ. रजनी सरीन यांनी १९९९ साली फर्रुखाबाद नगर पालिका परिषद अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून राजकारणात विशेष ओळख निर्माण केली होती. १९९५ मध्ये निवडून आलेल्या पहिल्या महिला पालिका अध्यक्षा दमयंती सिंह यांना अनियमिततेच्या आरोपावरून १५ एप्रिल १९९९ रोजी तत्कालीन भाजप सरकारने पदावरून हटवले होते. यानंतर २० जून १९९९ रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार म्हणून डॉ. सरीन यांनी समाजवादी पक्षाच्या निर्मला शाक्य यांचा पराभव करून अध्यक्षपद मिळवले. १ जुलै १९९९ रोजी त्यांनी पदाची शपथ घेतली होती. मात्र, नंतर दमयंती सिंह यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांना पुन्हा अध्यक्षपदी घोषित करण्यात आले.

Dr. Rajni Sareen, senior BJP leader and former Farrukhabad Municipal Chairperson, passed away at the age of 77.
Tragic Road Accident : भीषण अपघात! ट्रक धडकल्यानंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर तुंगभद्रा पुलावरून कोसळला, ६ जणांचा मृत्यू

दोन दिवसांपूर्वी मंत्र्यांची भेट

डॉ. रजनी सरीन यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी राज्याचे वित्तमंत्री सुरेश खन्ना तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे मंत्री त्यांच्या निवासस्थानी गेले होते. दोन्ही मंत्र्यांनी त्यांची विचारपूस करत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com