ST Employees: मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

Big Boost for Maharashtra ST Workers: एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मोठी घोषणा केली. ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली.
ST Employees: मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा
Minister Pratap SarnaikSaam tv
Published On
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ

  • ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली

  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

  • एसटी कर्मचाऱ्यांची सुमारे १०० कोटी रुपयांची थकबाकी देण्याचा निर्णयही घेण्यात आला

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्यात आली. महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मोठी घोषणा केली. आज परिवहन मंत्र्यांनी बैठक घेत या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, '७८ वर्षांपासून कर्मचारी आपल्या मागण्या मांडत असतात. राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता देण्याची मागणी कर्मचाऱ्यांची आहे. एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता ५३ टक्के दिला जात होता. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता ५८ टक्के दिला जात होता. त्यामुळे एसटी कर्मचारी नाराज होते. त्यांना ५३ वरून ५८ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.'

ST Employees: मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा
Crime News: फुटबॉलमध्ये करिअर घडवून देतो म्हणत जाळ्यात ओढलं; नंतर ३ वर्ष अत्याचार अन्..., १७ वर्षीय मुलीसोबत क्रूर कृत्य

त्यांनी पुढे असेही सांगितले की, 'त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांची जवळपास १०० कोटींची थकबाकी होती ती सुद्धा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी परिवहन मंत्री म्हणून मी सकारात्मक आहे. एसटी कर्मचाऱ्यांना ५ टक्के महागाई भत्ता वाढ देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी या संदर्भात चर्चा केली. या चर्चेत त्यांनी देखील या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मी मुख्यमंत्र्यांना निवदेन देणार आहे की जी थकबाकी आहे, आमच्यावर जो काही बोझा आहे तो कमी करण्यासाठी वित्त विभागाने सहकार्य करावे.'

ST Employees: मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा
Pune Crime : व्यावसायिक तरुणीच्या हत्येनं पुण्यात खळबळ; पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, धक्कादायक कारण उघड

यावेळी परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली. ते म्हणाले की, 'एसटीची आर्थिक घडी सावरत असताना कर्मचाऱ्यांच्या न्याय्य आर्थिक मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करू. संघटनांनी आंदोलन मागे घ्यावे . कृपया प्रवाशांना वेठीस धरू नये. सर्वसामान्य प्रवाशांना सेवा देण्यासाठी एसटी काम करते. त्यामुळे वित्त विभागाने आमच्यावर अन्याय करता कामा नये. वित्त खात्याच्या पत्रानंतर खेद व्यक्त केला. आम्ही उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. वित्त विभागाने आमच्याकडे सकारात्मक भूमिकेतून पहावं. महामंडळाचे नुकसान होत असलेले मार्ग बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने उपाययोजना करत आहोत. मुख्यमंत्र्यांचं लक्ष आमच्याकडे असतं. महायुती सरकारमध्ये श्रेयवादाचा मुद्दा नाही.'

ST Employees: मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा
Badlapur Crime: दुहेरी हत्याकांडाने बदलापूर हादरलं, धारदार शस्त्राने वार करत महिला अन् पुरूषाची हत्या; बंद कारमध्ये आढळले मृतदेह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com