Accident News : भरधाव बस काळ बनून आली, रिक्षाला १०० मीटरपर्यंत फरफटत नेले; देवदर्शनाला जाणाऱ्या एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Odisha bus rickshaw accident six family members dead : ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यात भरधाव बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. रिक्षाला १०० मीटरपर्यंत फरफटत नेले. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर अन्य चार जण जखमी झाले.
देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, बसच्या धडकेत रिक्षातील ६ जणांचा मृत्यू
odisha bus accident six family members killed after speeding bus hits rickshaw in ganjam saam tv
Published On

ओडिशातील गंजाम जिल्ह्यात शुक्रवार, २२ मे रोजी काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील होत्या. पुरुषोत्तमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाडकापल्ली चौकाजवळ हा अपघात झाला. एका भरधाव बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बसने रिक्षाला १०० मीटरपर्यंत फरफटत नेले. अपघातानंतर जोरदार आवाज झाला. प्रवाशांच्या किंचाळ्या ऐकायला येत होत्या. अपघातस्थळी एकच गोंधळ उडाला होता.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रिक्षामध्ये एकाच कुटुंबातील १० जण होते. हे सर्व सदस्य माँ सिंहासिनी मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्याचवेळी लाडकापल्ली चौकाजवळ बसने रिक्षाला जोरदार धडक (Accident) दिली. ही बस भरधाव आली होती. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटले आणि थेट रिक्षाला धडकली. बऱ्याच अंतरापर्यंत रिक्षा फरफटत गेली. यात रिक्षाचाही चक्काचूर झाला.

बसचा वेग जास्त होता. त्यामुळे धडकेनंतरही ती एका जागी थांबली नाही. त्या बसने रिक्षाला १०० मीटरपर्यंत फरफटत नेले. या दुर्घटनेनंतर बसचालक घटनास्थळावरून पसार झाला. रिक्षाचा चक्काचूर झाला. त्यात प्रवासी अडकले होते. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, बसच्या धडकेत रिक्षातील ६ जणांचा मृत्यू
Mumbai Accident : बीएमसीच्या गाडीची मायलेकराला धडक; यारी रोड परिसरात खळबळ

या अपघातानंतर स्थानिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. काही वेळाने पोलीस आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचली. जखमींना जवळच्या कोदला रुग्णालयात नेण्यात आले. जखमींची प्रकृती गंभीर होत असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी ब्रह्मपूरच्या एमकेसीजी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात नेण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी या अपघाताच्या घटनेची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भरधाव बसमुळे हा भीषण अपघात झाल्याचे प्राथमिक चौकशीत सांगण्यात आले. घटनेनंतर पसार झालेल्या बसचालकाचा शोध घेण्यात येत आहे. अपघातस्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी माध्यमांना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com