

सुनेत्रा पवारांचा बारामती पोटनिवडणुकीत विक्रमी विजय
२.१८ लाख मतांच्या फरकाने ऐतिहासिक कामगिरी
देश व राज्यातील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर बारामती विधानसभेची पोट निवडणुकीत सुनेत्रा पवार या दोन लाख 18 हजार अशा विक्रमी मताने निवडून आल्या असून त्यांच्या नावे देशात व राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम झाला आहे पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला आहे आता या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना राज्यातील सर्वाधिक विक्रमी मताधिक्याने निवडून येण्याचा मान मिळवला आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये तीन लाख 83 हजार 767 मतदार आहेत2024 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार निवडून आले होते. परंतु त्यावेळीही बारामती विधानसभा मतदारसंघात 24 उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांविरोधात राष्ट्रवादी एसपीचे युगेंद्र पवार मैदानात होते. अजित पवारांना 181,132 मतं मिळाली होती तर दुसऱ्या नंबरवर असलेल्या युगेंद्र पवारांना 80,233 इतकी मतं मिळाली होती.
वंचितकडून लढलेल्या मंगलदास निकाळजेंना केवळ 1,584 मतं मिळाली होती. 2024 च्या निवडणुकीत अपक्षांसहित लहानसहान पक्षांचे एकूण 24 उमेदवार रिंगणात होते. 3,80,608 पैकी 2,73,116 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. 72% अशी मतदानाची आकडेवारी होती.
आताच्या निवडणुकीमध्ये 23 उमेदवार रिंगणात आहेत मात्र सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याने या ठिकाणी 22 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र या सर्वांचे डपॉझिट जप्त झाले आहे या निवडणुकीत 58.17% मतदान झाले होते दोन लाख 23 हजार 705 इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम 2022 मध्ये उत्तर प्रदेश येथील साहिबा बाद विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुनील कुमार शर्मा 2 लाख 14,835 मताधिक्य मिळवले होते तेलंगणा विधानसभा मतदारसंघ 2023 मध्ये विधानसभा निवडणुकीत केटी रामराव श्री शैल्य संघातून 2 लाख 14000 पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे तर राज्यात सातारा मतदारसंघातून भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे एक लाख 42 हजार 124 मताधिक्याने विजयी झाले आहेत.
त्यांचे नावे राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम आहे 2019 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक लाख 65 हजार च्या मताधिक्याने निवडून आले होते मात्र आता सुनेत्रा पवार यांनी राज्याचा आणि देशाचा विक्रम मोडीत काढला आहे आता राज्यात आणि देशातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवार यांनी केला आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा झंजावात पाहता त्यांना बारामतीकर भरभरून मताने विजय करत असे मात्र विमान अपघातात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना राज्यातून नव्हे तर देशातून सर्वाधिक मताधिक्य देऊन विजय करत पहिल्या महिला उपमुख्यमंत्री तर देशात पहिल्या क्रमांकाचे महिला विजय झाल्याचा मान दिला आहे.
सुनेत्रा पवार यांना २ लाख १८ हजार ९३० मतांचे मताधिक्य मिळाले आहे.
२३ फेरीत सुनेत्रा पवार यांनी मिळालेलं मताधिक्य - १ लाख १० हजार ८६ मतं
सुनेत्रा पवार यांना फेरी निहाय प्राप्त झालेली मतं
फेरी १. 8868
फेरी २. 7675
फेरी ३. 10230
फेरी ४: 9604
फेरी ५: 8419
फेरी ६ : 8682
फेरी ७ : 8439
फेरी ८: 8725
फेरी ९: 7886
फेरी १०: 9300
फेरी ११: 7924
फेरी १२: 8057
फेरी १३: 8559
फेरी १४: 9587
फेरी १५: 11061
फेरी १६: 8993
फेरी १७: 9161
फेरी १८: 8190
फेरी १९: 9489
फेरी २०: 11065
फेरी २१: 10037
फेरी २२: 8975
फेरी २३: 11086
फेरी २४: 9212
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.