Baramati bypoll : बारामतीमध्ये सुनेत्रा पवार गाठणार "मॅजिक फिगर"? अजितदादांचा विक्रम मोडला जाणार?

Baramati bypoll results Sunetra Pawar winning margin : बारामती पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून सुनेत्रा पवार अजित पवारांचा विक्रम मोडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘मॅजिक फिगर’ गाठून ऐतिहासिक मताधिक्य मिळणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Baramati vote counting Sunetra Pawar
Counting of votes underway in Baramati as Sunetra Pawar eyes a record-breaking victory margin.Saam Tv
Published On

Baramati election result live : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ऐतिहासिक मताधिक्याचा नवा विक्रम प्रस्थापित करणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. बारामतीमध्ये अजितदादांचा विक्रम मोडणार का? नवा 'रेकॉर्ड' होणार की का? याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.

मताधिक्याचा नवा विक्रम होणार?

महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठे रेकॉर्डब्रेक मताधिक्य मिळवण्याचा दावा महायुतीकडून केला जात आहे. बारामती पोटनिवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांचा एकही उमेदवार रिंगणात नसल्याने सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी मानली जात आहे. फक्त विजय नाही तर सर्वोच्च मताधिक्य मिळवून विक्रम करण्याच्या उद्देशाने महायुतीने जोर लावला.

Baramati vote counting Sunetra Pawar
Maharashtra Politics : महाराष्ट्राला मिळाले १० नवे आमदार, सर्व यादी एका क्लिकवर

काय आहे 'मॅजिक फिगर'चे गणित?

या पोटनिवडणुकीत एकूण २ लाख २३ हजार ७०५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. २३ एप्रिल रोजी झालेल्या या मतदानात सुमारे ५८ टक्के मतदान झाले होते. आता या एकूण मतदानापैकी किमान १ लाख २३ हजार २६५ मतं जर सुनेत्रा पवार यांना मिळाली, तर अजित पवारांचा विक्रम मोडीत निघेल आणि मताधिक्याचा नवा विक्रम प्रस्थापित होऊ शकणार आहे.

Baramati vote counting Sunetra Pawar
सोलापूर हादरलं! भररस्त्यात ३५ वार, डोकं चेंदामेंदा; चेहरा ओळखणंही कठीण, 'त्या' भयंकर हत्याकांडाचा थरारक Video समोर

बारामती विधानसभा मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबाचे निर्विवाद वर्चस्व राहिलं आहे. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे यंदाच्या निवडणुकीला एक भावनिक किनार होती. अजित दादांच्या आठवणी आज ही बारामतीकरांच्या मनात आहेत. दादांचा वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी स्वतः बारामती मध्ये झालेल्या सभेत स्थानिकांना आश्वासन दिलं होतं. पोटनिवडणूक जरी असली तरी सुद्धा बारामती मध्ये राष्ट्रवादी ने सर्वत्र प्रचार केला. राष्ट्रवादी सोबत युती मधील पक्षातील नेत्यांनी सुद्धा बारामती मध्ये प्रचार केला होता. सांगता सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक मंत्री त्यासोबतच शिवसेनेकडून उद्योग मंत्री उदय सामंत यासह अनेक जणं उपस्थित होते. या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी ने निवडणुकीपूर्वीच सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला होता. काँग्रेस ने सुद्धा दिलेली उमेदवारी अखेरच्या दिवशी मागे घेतली होती. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक केवळ औपचारिकता आहे. बारामती मध्ये झालेलं मतदान पाहता राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार मताधिक्याचा रेकॉर्ड मोडून नवा विक्रम त्यांच्या नावावर करून बारामतीकरांचा विश्वास आणखी मजबूत करतील अशी अपेक्षा आहे.

Baramati vote counting Sunetra Pawar
सोलापूरचं 'मिर्झापूर' झालंय का? ७२ तासांत ६ हत्या; कोणाचा गळा चिरला तर कुणाला दगडाने ठेचलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com