सम्राट झाले बिहारचे चौधरी, नितीश कुमारांच्या पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री

Samrat Choudhary Sworn In As Bihar Chief Minister Full Details: बिहारमध्ये राजकीय मोठा बदल घडला असून सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले असून दोन जेडीयू नेत्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
Samrat Choudhary takes oath as Bihar Chief Minister as BJP forms new government in the state.
Samrat Choudhary takes oath as Bihar Chief Minister as BJP forms new government in the state.saam tv
Published On

बिहार राज्यात आजपासून सम्राट चौधरी युग सरू झाले असून त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बिहारला पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन झाल्याने भाजपमध्ये जोरदार जल्लोष पाहायला मिळत आहे. सम्राट चौधरी हे बिहार राज्याचे 24 वे मुख्यमंत्री बनले. या शपथविधीमध्ये भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन, जेपी नड्डा आणि चिराग पासवान यांच्या समवेत अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. तर विजय चौधरी आणि बिजेंद्र यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतले. हे दोन्ही नेते JDU पक्षाचे आहे.

Samrat Choudhary takes oath as Bihar Chief Minister as BJP forms new government in the state.
Accident : भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, १५ जखमी

आता राज्यसभेचे खासदार असलेल्या नितीश कुमार यांनी मंगळवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि आपले मंत्रिमंडळ बरखास्त केले, ज्यामध्ये सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे महत्त्वाचे गृह मंत्रालयही होते. सम्राट चौधरी तारापूरचे भाजप आमदार आहेत. ते २०१७ मध्ये भाजपमध्ये सामील झाले. यापूर्वी त्यांनी आरजेडी आणि जेडीयूमध्ये काम केले आहे.

Samrat Choudhary takes oath as Bihar Chief Minister as BJP forms new government in the state.
Accident : भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, १५ जखमी

सम्राट चौधरी १९९९ मध्ये पहिल्यांदा बिहार सरकारमध्ये मंत्री झाले. राबडी देवी सरकारमध्ये कृषी मंत्री झाल्यानंतर, ते त्यांच्या वयाच्या वादामुळेही चर्चेत आले. शकुनी चौधरी यांचे पुत्र असलेल्या सम्राट चौधरी यांना लालू यादव यांनी इतर मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व करणारे तरुण नेते म्हणून संधी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com