रूग्णालयात हॅकर्सची नजर; महिलांचे खासगी व्हिडिओ लीक, हजारो क्लिप पॉxxx साईटवर अपलोड

India’s Biggest CCTV Hack: डीफॉल्ट पासवर्डमुळे राजकोटमधील रूग्णालयाचा सीसीटीव्ही हॅक. हकर्सनी महिलांचे खासगी व्हिडिओ चोरून पॉर्न साइट्सवर विकले.
India’s Biggest CCTV Hack
India’s Biggest CCTV HackSaam
Published On

बऱ्याचदा, आपण सोशल मीडिया अकाउंट्स, घरातील वाय फाय किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी पासवर्ड इतके सोपे सेट करतो की, कुणीही त्याचा अंदाज लावू शकतो. मात्र, हे अत्यंत धोकादायक आहे. अलिकडेच गुजरातमधील राजकोट येथील एका रूग्णालयात 'admin123' या डीफॉल्ड पासवर्डमुळे मोठ्या प्रमाणात महिलांचे खासही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ पॉर्न साईट्सवर अपलोड करण्यात आले आहे.

राजकोटच्या पायल मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये सुरू झालेले हे प्रकरण भारतातील सर्वात गंभीर सायबर घोटाळ्यांपैकी एक आहे. हॅकर्सने डिफॉल्ड पासवर्ड वापरून हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही सिस्टममध्ये प्रवेश केला. तसेच स्त्रीरोग वॉर्डमधील महिलांचे खासगी व्हिडिओ चोरले. त्यानंतर त्यांनी हे व्हिडिओ परदेशी पोर्नोग्राफिक नेटवर्क्सना विकले.

India’s Biggest CCTV Hack
प्रसिद्ध कथावाचकाचं अश्लील कांड; कारमध्ये महिलेसोबत शरीरसंबंध ठेवताना रंगेहाथ पकडलं, नागरिकांनी चोप देत शेंडी कापली

तपासात असे दिसून आले की, हे नेटवर्क जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ पर्यंत सक्रिय होते. हॅकर्सनी देशभरातून अंदाजे ५० हजार क्लिप्स चोरल्या आहेत. 'मेघा एमबीबीएस' आणि 'सीपी मोंडा' या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ क्लिप्स समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. टेलिग्राम ग्रुपला देखील याचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. हे व्हिडिओ ७०० ते ४हजार रूपयांपर्यंत विकण्यात आले.

India’s Biggest CCTV Hack
गर्लफ्रेंडचं लग्न झालं, 24x7 लक्ष ठेवण्यासाठी बॉयफ्रेंडनं झुडुपात कॅमेरा बसवला, पतीनं पाहताच.. नेमकं घडलं काय?

पोलिसांच्या तपासात असे दिसून आले की, पुणे, मुंबई, नाशिक, सुरत, अहमदाबाद आणि दिल्ली यांसारख्या शहरांसह देशभरातील ८० सीसीटीव्ही सिस्टम हॅक करण्यात आले. आरोपींवर फेब्रुवारी २०२५ च्या सुरूवातीला अटकेची नोंद करण्यात आली होती. मात्र, हे व्हिडिओ जून महिन्यापर्यंत टेलिग्रामवर विकले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com