गर्लफ्रेंडचं लग्न झालं, 24x7 लक्ष ठेवण्यासाठी बॉयफ्रेंडनं झुडुपात कॅमेरा बसवला, पतीनं पाहताच.. नेमकं घडलं काय?

Hidden CCTV Found Behind Woman’s House in Mehsana: गुजरातमध्ये प्रियकराचा वेडेपणा. गर्लफ्रेंडवर लक्ष ठेवण्यासाठी घरामागे बसवला सीसीटीव्ही कॅमेरा.
Shocking in Gujarat Man Installs CCTV Camera to Spy on Married Lover
Shocking in Gujarat Man Installs CCTV Camera to Spy on Married LoverSaam Tv
Published On

गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रियकराने विवाहित प्रेयसीवर लक्ष ठेवण्यासाठी एक शक्कल लढवली. त्यानं प्रेयसीच्या घरामागील झुडुपात सीसीटीव्ही कॅमेरा बसवला होता. याद्वारे तो तिच्यावर २४/७ लक्ष ठेवत होता. जेव्हा प्रेयसीच्या पतीला अलिकडेच झुडुपात कॅमेरा सापडला, तेव्हा त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासासाठी कॅमेरा आणि फुटेज तपासासाठी पाठवले आहेत.

मेहसाणा पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ही काडी तालुक्यातील एका गावात अंगणवाडी सेविका आहे. महिलेचे आरोपीशी १० वर्षांपासून संबंध होते. काही महिन्यांनंतर तिचं लग्न झालं. लग्नानंतरही दोघं सातत्याने संवाद साधत होते. पण एके दिवशी तिच्या पतीने फोन आणि मेसेज पाहिले. तेव्हा त्यांचे गुपित उघड झाले.

Shocking in Gujarat Man Installs CCTV Camera to Spy on Married Lover
'६,५०० रूपयातील साडेचार मॅडमच्या खात्यात पाठव'; शेतकऱ्याच्या अनुदानावर शासकीय कर्मचाऱ्याचा डोळा, Audio क्लिप व्हायरल

यानंतर दोघांमध्ये वाद झाला. पतीनं पत्नीला तिच्या प्रियकरासोबत संबंध संपवण्यास भाग पाडले. पत्नीने पतीचे म्हणणे ऐकून प्रियकरासोबत संवाद साधणे बंद केले. दोघेही आरोपीला जाऊन भेटले. तसेच प्रियकराला महिलेच्या पतीने कोणतेही संबंध न ठेवण्यास सांगितले. परंतु, प्रियकराने नकार दिला. आरोपी वारंवार तिचा पाठलाग करायचा. अंगणवाडीपासून तिच्या घरापर्यंत सतत तिच्यावर लक्ष ठेवून होता.

अलिकडेच महिलेचा पती घराभोवती झुडपे साफ करत असताना एक छोटा सीसीटीव्ही कॅमेरा आढळला. जेव्हा पतीने डिव्हाइसचे मेमरी कार्ड तपासले, तेव्हा फुटेजमध्ये आरोपी कॅमेऱ्यासमोर दिसत होता. महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपीनं महिलेच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला असावा. आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Shocking in Gujarat Man Installs CCTV Camera to Spy on Married Lover
नाशिकमध्ये राजकीय भूकंप! दोन बड्या नेत्यांची शरद पवार गटातून हकालपट्टी, भाजपचं कमळ हाती घेण्याच्या तयारीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com