नाशिकमध्ये राजकीय भूकंप! दोन बड्या नेत्यांची शरद पवार गटातून हकालपट्टी, भाजपचं कमळ हाती घेण्याच्या तयारीत

Sharad Pawar Faction Expels Two Leaders: नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठी घडामोड. दोन बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी. भाजप प्रवेशाच्या चर्चांदरम्यानच हकालपट्टीची कारवाई.
Sharad Pawar Faction Expels Two Leaders
Sharad Pawar Faction Expels Two LeadersSaam
Published On

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय घडमोडींना वेग आला आहे. नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी घडामोड घडली आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिलेल्या उदय सांगळे आणि सुनिता चोरास्कर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

प्रत्येक पक्ष तसेच नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. अशातच कुठे फोडाफोडीचं राजकारण तर, कुठे मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. अशातच नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून दोन नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

Sharad Pawar Faction Expels Two Leaders
आधी भावाचा खून, नंतर वहिनीवर बलात्कार करून पोटावर लाथ मारली, भ्रूण गर्भाशयाच्या बाहेर येताच मृत्यू

उदय सांगळे आणि सुनिता चारोस्कर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सिन्नर मतदारसंघातून उदय सांगळे आणि दिंडोरी मतदारसंघातून सुनिता चारोस्कर यांनी निवडणूक लढवली होती. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Sharad Pawar Faction Expels Two Leaders
गर्लफ्रेंड घरात एकटी, बॉयफ्रेंड खोलीत शिरला; भावांनी पाहिलं अन् चोप दिला, तरूणाचा जागीच मृत्यू

पक्षविरोधी भूमिका, स्वार्थी आणि दलबदलू मानसिकतेमुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याची नोंद शरद पवार गटाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रात करण्यात आली आहे. दरम्यान, दोन्ही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाच, त्यापूर्वीच त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.

Sharad Pawar Faction Expels Two Leaders
बॉडी मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांना माहिती मिळताच टाकली रेड, आरोपी फरार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com