एक दिवसाची सुट्टी घेतली नंतर आलेच नाहीत; साडेतीन महिन्यांपासून IPS अधिकारी बेपत्ता, पोलीस प्रशासनात खळबळ

IPS Officer Missing : वरिष्ठ आयपीएस अधिकारी तीन महिन्यांहून अधिक काळापासून बेपत्ता आहेत. त्यामुळे राजस्थान पोलिसांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे. काळूराम रावत असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
IPS Officer Missing
File photo of IPS officer Kaluram Rawat, who has been missing for over three months.saam tv
Published On
Summary
  • आयपीएस अधिकारी साडेतीन महिन्यांपासून बेपत्ता

  • एक दिवसाची सुट्टी घेऊन घरी गेले होते

  • पोलिस प्रशासनात खळबळ

राजस्थान पोलीस दलात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रकृती बरी नसल्याने एक दिवसांची सुट्टी घेऊन घरी गेलेले आयपीएस पोलीस अधिकारी साडेतीन महिन्यांपासून कर्तव्यावर परतलेच नाहीत. विशेष म्हणजे याचा कोणत्याच अधिकाऱ्याला पत्ता लागलाच नाही. साडेतीन महिन्यांपासून बेपत्ता असल्याची बाब समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

IPS Officer Missing
Pune Crime: तीन वर्षाच्या मुलावर अत्याचार करून निर्घृण खून; भोरनंतर पुण्यात आणखी एक संतापजनक घटना

या बेपत्ता असलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचे नाव काळूराम रावत आहे. ते भ्रष्टाचार प्रतिबंधक ब्युरोमध्ये कार्यरत आहेत. काळूराम रावत हे राजस्थान केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळलीय.

दरम्यान पोलीस अधिकारी रावत यांनी तब्येत बरी नसल्याने कर्तव्यावर येऊ शकत नाही, त्यामुळे एका दिवसासाठी सुट्टी द्यावी, अशी विनंती करून ते घरी गेले. परंतु जवळपास साडेतीन महिने होऊन गेले तरी ते परतलेच नाहीत, त्यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. एक, दोन दिवस झाले तरीही ते कर्तव्यावर रुजू झाले नाहीत. तब्येत बरी झाली की ड्युटीवर पुन्हा येईन असं त्यांनी आपल्या सुट्टीच्या अर्जात म्हटलं होतं.

IPS Officer Missing
परीक्षेला जाताना रस्त्यात अडवलं अन्...; गावगुंडांकडून तरुणीची छेड, संगमनेरमधील धक्कादायक घटना

परंतु ते साडेतीन महिने ड्युटीवर आलेच नाहीत. या काळात त्यांची बढती आणि बदली देखील झाली. पण त्या विभागात देखील आले नाहीत. आधीचा कारभार देखील सोडण्यासाठी ते कार्यालयात आले नाहीत. यानंतर पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्या. विशेष म्हणजे आयपीएस अधिकारी रावत यांचा मोबाईल फोन सतत बंद येत आहे. यामुळे पोलीस विभागाची चिंता वाढली आहे. रावत यांचा शोध घेण्यासाठी राजस्थान पोलिसांनी तातडीने शोध पथके तयार केली आहेत. विविध ठिकाणी त्यांचा शोध घेतला जातोय ते स्वेच्छेने कोठे गेले आहेत की यामागे काही वेगळे कारण आहे, याबाबत काहीच माहिती नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com