परीक्षेला जाताना रस्त्यात अडवलं अन्...; गावगुंडांकडून तरुणीची छेड, संगमनेरमधील धक्कादायक घटना

Ahilyanagar Crime : संगमनेरमध्ये गावगुंडांनी परीक्षेला जाणाऱ्या एका मुलीची छेड काढली आहे. याआधी अॅसिड हल्ला आता मुलीची छेडछाड प्रकरण यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
Ahilyanagar  Crime :
Local residents gather after a harassment incident in Sangamner, raising concerns over student safety.saam tv
Published On
Summary
  • परीक्षेसाठी निघालेल्या तरुणीची गावगुंडांकडून छेडछाड

  • स्थानिक नागरिकांकडून छेड काढणाऱ्या एकाला चोप

  • शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सचिन बनसोडे, साम प्रतिनिधी

पुण्यातील ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार प्रकरणानंतर संगमनेरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. परीक्षेसाठी निघालेल्या तरुणीची गावगुंडांनी छेढ काढल्याचा संतापजक प्रकार संगमनेरमध्ये घडला आहे. संगमनेर तालुक्यात शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसापूर्वी सहावीत शिकणाऱ्या मुलीवर अॅसिड हल्ला झाला होता. अॅसिड हल्ला करणारा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचदरम्यान तरुणीची छेड काढल्याचा प्रकार घडला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार,तरुणी दुचाकीवरून परीक्षेसाठी जात होती त्यावेळी गावगुंडांनी तिला अडवलं. तिची छेड काढली. दरम्यान हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात आला. नागरिकांनी छेडकाढणाऱ्यांना पकडलं. त्यातील एकजण पळून गेला. दुसरा मात्र स्थानिकांच्या हाती लागला. नागरिकांनी त्याला जबरदस्त चोप दिला. त्यानंतर नागरिकांनी याप्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.

Ahilyanagar  Crime :
Pune Crime: तीन वर्षाच्या मुलावर अत्याचार करून निर्घृण खून; भोरनंतर पुण्यात आणखी एक संतापजनक घटना

परंतु पोलीस घटनास्थळी उशिरा पोहचल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला.नागरिकांना पोलिसांनाही फैलावर घेतलं. त्यानंतर नागरिकांनी छेड काढणाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, मुली परीक्षेसाठी दुचाकीवर जात होती. त्यावेळी गावगुंड तिचा पाठलाग करत होते. एका ठिकाणी त्यांनी तिला अडवलं. त्यानंतर तिने आरडाओरड केली. मुलीची आरडाओरड ऐकून नागरिकांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली आणि आरोपींना मारहाण केली.

Ahilyanagar  Crime :
Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला

साईबाबांचं जगप्रसिद्ध तिर्थक्षेत्र शिर्डीतील लोणी गावात काही दिवसापूर्वी १३ वर्षांच्या चिमुकलीवर अॅसिड हल्ला झाला होता. आरोपीने शाळेतून घरी जाणाऱ्या मुलीला रस्त्यात अडवलं. त्यानंतर तिच्यावर अॅसिड हल्ला केला. ज्या ठिकाणी हल्ला झाला तो ग्रामीण भाग आहे, तेथे कुठेच सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाहीये.

४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या

पुण्यातील भोर तालुक्यात एका चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे आलेल्या ४ वर्षाच्या मुलीवर एका वयोवृद्ध व्यक्तीने अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या केली. ही संतापजनक घटना भोर तालुक्यातील नसरापुर गावात घडली आहे. ही अल्पवयीन मुलगी नसरापूरला सुट्टीनिमित्त तिच्या आजीकडे राहण्यासाठी आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com