Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

Mayor Election Results: राजस्थानच्या महापौर निवडणुकीत भाजपने ७ पैकी ६ महापालिकांमध्ये सत्ता मिळवली. अजमेर आणि पालीमध्ये काँग्रेसकडे अधिक नगरसेवक असूनही भाजपचा महापौर झाला.
Rajasthan mayor election 2026 BJP wins six municipal corporations
Rajasthan mayor election 2026 BJP wins six municipal corporationsSaam TV
Published On

Rajasthan mayor election 2026 BJP wins six municipal corporations : राजस्थानच्या महापौर निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळवत ७ पैकी ६ महापालिकेवर (Municipal Corporations) झेंडा फडकावला आहे. या निवडणुकीतील सर्वात मोठा उलटफेर अजमेर आणि पाली नगरनिगमांमध्ये पाहायला मिळाला. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवक आणि बहुमत मिळवण्यासाठी अनुकूल परिस्थिती असतानाही, काँग्रेसमध्ये झालेली फूट (क्रॉस व्होटिंग) आणि अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे भाजपने बाजी मारली. काँग्रेसला केवळ बीकानेरमध्येच आपला महापौर निवडून आणता आला आहे.

राजस्थानमध्ये ७ महानगरपालिकांसह २७३ संस्थांमध्ये महापौर आणि अध्यक्षांच्या निवडणुका पार पडल्या. अनेक ठिकाणी भाजपने विजय मिळवला. धक्कादायक म्हणजे, ज्या ठिकाणी काँग्रेस सहज जिंकेल अशी परिस्थिती होती, तिथेही भाजपने विजय खेचून आणला. सात महानगरपालिकांपैकी काँग्रेसला फक्त एकाच ठिकाणी आपला महापौर निवडून आणण्यात यश आले, तर उर्वरित ठिकाणी भाजपने विजय मिळवला.

Rajasthan mayor election 2026 BJP wins six municipal corporations
ज्या बापाने बोट धरून चालायला शिकवलं, त्याच्याच अंत्यविधीसाठी मुलाला वेळ नाही; महाराष्ट्रात मन हेलावून टाकणारी घटना

बहुमत असूनही अजमेर आणि पाली येथील महापौरपदाच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. काँग्रेसला फक्त बिकानेरमध्ये महापौरपदाची जागा मिळवता आली. या ठिकाणी काँग्रेसचे अनिल कल्ला महापौर झाले. भाजपने अजमेर आणि पालीमध्ये मोठा उलटफेर केला. उदयपूर आणि अलवरमध्येही भाजपचे महापौर निवडून आले आहेत. दोन महानगरपालिकांमध्ये भाजपचे महापौर आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे, आता सातपैकी सहा महानगरपालिकांवर भाजपचे वर्चस्व आहे.

Rajasthan mayor election 2026 BJP wins six municipal corporations
घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा! २३ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून 'यलो अलर्ट

राजस्थानमधील सात महानगरपालिकांमध्ये महापौरपदाच्या निवडणुका होणार होत्या. भिलवाडा आणि भरतपूरमध्ये भाजपचे महापौर बिनविरोध निवडून आले. त्यामुळे सोमवारी पाच महानगरपालिकांमध्ये महापौरपदाच्या निवडणुका घेण्यात आल्या.अजमेर आणि पालीमध्ये सर्वात धक्कादायक निकाल लागले. अजमेरमध्ये भाजपच्या अनामिका शर्मा यांना ४३ मते मिळाली. पण भाजपकडे संख्याबळ फक्त ३२ होतं. दुसरीकडे पालीच्या महापौर नमिता बुबाकिया यांना ३३ मते मिळाली. पण या ठिकाणी भाजपकडे फक्त २१ मते होती. काँग्रेस उमेदवार सुमित्रा जैन यांना फक्त ३ मते मिळाली, या ठिकाणी काँग्रेसकडे २९ नगरसेवक होते. क्रॉस व्होटिंगमुळे भाजपने दणदणीत विजय मिळवला.

Rajasthan mayor election 2026 BJP wins six municipal corporations
Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! सुवर्ण बाजारात आज अचानक भाव कोसळले; पाहा नवीन दर

उदयपूरमध्ये भाजपचे पारस सिंघवी महापौरपदाची निवडणूक जिंकले. भाजपचे ५३ नगरसेवक असल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित होता. अलवरमध्ये भाजपच्या सुमनलता अग्रवालही विजयी झाल्या. सुमनलता यांना ३२ मते मिळाली, तर काँग्रेसचे कमलेश शर्मा यांना २३ मते मिळाली. काँग्रेसला फक्त बिकानेरमध्ये महापौर निवडून आणता आला. बिकानेरमध्ये काँग्रेसचे ४२ नगरसेवक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com