Maharashtra Weather Today, IMD Yellow Alert : देशातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असला, तरी महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर अजून कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २१ आणि २२ सप्टेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने तब्बल २३ जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' जारी केला आहे. २३ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra weather forecast today)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबरपासून राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस पडू शकतो, मात्र राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाचा जोर ओसरलेला पाहायला मिळेल.
दक्षिण ओडिशा आणि उत्तर किनाऱ्यावरील आंध्र प्रदेशात २३ व २४ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दक्षिण छत्तीसगडमध्ये २४ सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो.
महाराष्ट्रात २१ सप्टेंबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, हिंगोली, परभणी, नांदेड, नाशिकचा घाट परिसर, अहिल्यानगर, पुण्याचा घाट परिसर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या भागांसाठी 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे.
२२ सप्टेंबरला विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांसह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव तसेच कोकणातील काही भागांत पावसाचा जोर कायम राहू शकतो. या भागांतही 'येलो अलर्ट'ची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २३ सप्टेंबरपासून राज्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, दक्षिण महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाच्या सरी सुरू राहू शकतात. उर्वरित भागात ढगाळ वातावरण किंवा तुलनेने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.