ज्या बापाने बोट धरून चालायला शिकवलं, त्याच्याच अंत्यविधीसाठी मुलाला वेळ नाही; महाराष्ट्रात मन हेलावून टाकणारी घटना

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये ८० वर्षीय वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाने अंत्यसंस्कारासाठी वेळ नसल्याचे सांगितल्याची घटना समोर आली. अखेर वृद्धाश्रमाच्या संचालिकेने पुढाकार घेतला.
Chhatrapati Sambhajinagar latest news
Chhatrapati Sambhajinagar latest newsसाम टीव्ही
Published On

माधव सावरगावे, संभाजीनगर प्रतिनिधी

Chhatrapati Sambhajinagar latest news : ज्या बापाने आपल्या पोटच्या पोराला बोट धरून चालायला शिकवलं, त्याला लहानाचं मोठं केलं, त्याच बापाच्या अंत्यविधीसाठी मुलाने 'वेळ नाही' असे सांगितल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. मुलाने वडिलांच्या अंत्यसंस्काराला येण्यास नकार दिल्याने वृद्धाश्रमाच्या संचालिकेने पुढाकार घेत अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडण्याचे ठरवले. मात्र, वृद्धाश्रमाच्या संचालकांनी पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगितल्यानंतर कुटुंबाने मृतदेह घरी नेऊन अंत्यसंस्कार केले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. ८० वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला, पण अंत्यविधीसाठी मुलानेच पाठ फिरवली. "आम्हाला वेळ नाही, तुम्हीच अंत्यसंस्कार उरकून घ्या," असे उत्तर मुलाने दिल्याने समाजात नाती कुठे चालली आहेत, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशन परिसरात हे ८० वर्षीय आजोबा अर्धांगवायूच्या आजाराने गंभीर अवस्थेत आढळले होते. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करण्यात आली.

Chhatrapati Sambhajinagar latest news
मुंबईच्या ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले अन् ताटात काय दिसलं? प्रसिद्ध डॉक्टरांचा थेट तुकाराम मुंढेंकडे संताप

वृद्धाश्रमाच्या संचालिका उमा दुपे यांनी त्यांच्या कुटुंबाचा शोध घेऊन मुलगा आणि सून यांना शोधून काढले. मात्र, "लहान मुलाचे लग्न करायचे असल्याने घर छोटे पडेल," असे कारण देत वडिलांना वृद्धाश्रमातच ठेवण्यात आले. या वयोवृद्ध वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाला कळवण्यात आले; मात्र मृत्यूनंतरही मुलाकडे वडिलांसाठी वेळ नव्हता.

Chhatrapati Sambhajinagar latest news
Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

अखेर वृद्धाश्रमाच्या संचालिका उमा दुपे यांनी पुढाकार घेत त्या पित्याला निरोप देण्याचे ठरवले. परंतु त्यापूर्वी त्यांनी पोलिसांत तक्रार करणार असल्याचे मुलाला सांगितले. त्यानंतर मात्र मुलाने नमते घेत वडिलांना घरी नेऊन अंत्यसंस्कार केले. जन्मापासून ते स्वतःच्या पायावर उभे राहेपर्यंत ज्या वडिलांनी मोठा आधार दिला, त्यांनाच आजारपणात मुलाने रस्त्यावर सोडले होते. इतकेच नाही, तर निधनानंतर अंत्यसंस्कार करण्याचीही त्याची इच्छा नव्हती. ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून, बाप-मुलाच्या नात्याला आरसा दाखवणारी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com