मुंबईच्या ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले अन् ताटात काय दिसलं? प्रसिद्ध डॉक्टरांचा थेट तुकाराम मुंढेंकडे संताप

मुंबईच्या सहार येथील Romano रेस्टॉरंटमध्ये जेवताना टेबलवर झुरळ आढळल्याचा दावा प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक सेठ यांनी केला. FDAकडून कारवाई होणार का?
Dr Ashok Seth
Dr Ashok SethSaam TV
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Dr Ashok Seth : मुंबईतील सहार येथील फाईव्ह स्टार हॉटेलमधील 'Romano' रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेलेल्या प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक सेठ यांच्या टेबलवर झुरळ आढळल्याचं समोर आले आहे. त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबतचा दावा केला आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उच्च दर्जाच्या हॉटेलमधील अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

डॉ. अशोक सेठ हे शनिवारी रात्री सहार Romano रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या टेबलवर एक छोटे झुरळ आढळल्याचे त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. टेबलवर आलेले हे झुरळ हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र ते जागेवरून हलले नाही, असा दावाही त्यांनी केला.

या प्रकारावर डॉ. सेठ यांनी काहीशी विनोदी टिप्पणी करत त्या झुरळाचे नाव ‘Roachie’ असे ठेवले. ‘Roachie’ला पास्ताऐवजी पिझ्झा हवा असावा, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी पोस्टमध्ये केली. मात्र, विनोदाच्या पलीकडे या प्रकारामुळे जेवणाची इच्छा पूर्णपणे उडाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Dr Ashok Seth
Tukaram Mundhe : ११ रुपयांची सलाईनची नळी अन् ३२५ रुपयांचे बिल! तुकाराम मुंढेंच्या पत्राने वैद्यकीय क्षेत्रात उडाली खळबळ

झुरळ टेबलवर आढळल्यानंतर डॉ. सेठ आणि त्यांच्यासोबत असलेले लोक अखेर रेस्टॉरंटमधून निघून गेल्याचे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. तसेच, या घटनेची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची विनंती करत त्यांनी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अधिकाऱ्यांनाही टॅग केले आहे.

Dr Ashok Seth
Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

FDA कडून कारवाई होणार का?

या घटनेनंतर आता अन्नसुरक्षा आणि रेस्टॉरंटमधील स्वच्छतेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉटेलमध्ये असा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आल्याने याची जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान, डॉ. सेठ यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर FDA या प्रकरणाची दखल घेते का, संबंधित रेस्टॉरंटची पाहणी किंवा तपासणी केली जाते का आणि काही नियमभंग आढळल्यास कोणती कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मात्र, रेस्टॉरंट व्यवस्थापन अथवा FDA कडून या घटनेबाबत अधिकृत प्रतिक्रिया किंवा कारवाईची माहिती समोर येईपर्यंत, झुरळ नेमके कोणत्या भागातून टेबलवर आले आणि अन्न स्वच्छतेच्या नियमांचा प्रत्यक्ष भंग झाला का, याबाबत कोणताही स्वतंत्र अधिकृत निष्कर्ष उपलब्ध झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com