Modi Ki Guarantee Rajasthan Election: PM मोदींची गॅरंटी नेमकी काय? कोणती हमी दिलीय?

Modi guarantee : भाजपचा विजय पाहून पक्षातील नेते आनंदी झाले आहेत. दुपारी १२ वाजेपासून भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर आनंद साजरा करताना दिसले. भाजपने या राज्यातील निवडणूक पंतप्रधान मोदींच्या नावाने लढवली. या राज्यातील निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदींनी कोणती कसर सोडली नाही.
PM  Modi
PM Modi saam Tv
Published On

Rajasthan Assembly What is Modi Ki Guarantee :

देशातील चार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपला विजय मिळला. भाजपच्या या विजयाने काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. राजस्थानमध्ये भाजपने ११५ जागा आपल्या ताब्यात घेतल्या. राजस्थानचे अशोक गहलोत यांचा करिष्मा अपयशी ठरल्याचं दिसत आहे. (Latest News)

भाजपचा विजय पाहून पक्षातील नेते आनंदी झाले आहेत. दुपारी १२ वाजेपासून भाजप कार्यकर्ते पक्ष कार्यालयासमोर आनंद साजरा करत होते. भाजपने या राज्यातील निवडणूक पंतप्रधान मोदींच्या नावाने लढवली. या राज्यातील निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदींनी कोणतीच कसर सोडली नाही. निवडणूक प्रचाराचा धुराळा उडवत मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोदींच्या प्रचारामुळेच भाजपने विजय मिळवला, असल्याची प्रतिक्रिया अनेक दिग्गज नेत्यांनी दिलीय. इतकेच नाही तरी या विजयामुळे २०२४च्या लोकसभेची निवडणूक भाजप पंतप्रधान मोदींच्या नावानेच लढणार असल्याचं दिसत आहे. दरम्यान विजयानंतर भाजप नेते पंतप्रधान मोदी आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत आहेत. या विजयानंतर नेते प्रतिक्रिया देत आहेत.

त्यात मोदी यांची गॅरंटीमुळे भाजपने विजय मिळवला असं म्हणत आहे. त्यानंतर मोदी गॅरंटीचा ट्रेंड सुरू झाला. मोदीची गॅरंटीची इतकी चर्चा मतदारांमध्ये झाली की, मोदींच्या त्या विधानाने भाजपला थेट तीन राज्यात विजय मिळवून दिला. पण हे मोदींची गॅरंटी मोदींनी कुठे आणि कोणाला दिलीय?

राजस्थानच्या प्रचार सभेत दिली गॅरंटी

राजस्थानच्या जनतेचा काँग्रेसच्या लोकप्रिय आश्वासनांपेक्षा पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीवर अधिक विश्वास दाखवला. संपूर्ण निवडणूक पंतप्रधान मोदींच्या नावाने लढवली गेली.

  • राजस्थानमध्ये सरकार आल्यास ४५० रुपयांना गॅस सिलिंडर देणार.

  • भाजप सत्तेत आल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात करणार.

  • बेघर असलेल्या लोकांना २०२५पर्यंत त्यांना घरं देणार. प्रत्येक घर पिण्याचे पाणी देणारं

  • भाजपचे सरकार आल्यास चांगली कायदा आणि सुव्यवस्था, महिला सुरक्षा, भ्रष्टाचाराविरोधातील तपास, पेपरफुटीच्या दोषींवर कारवाई आणि सुशासनाची गॅरंटी. मोदींच्या या गॅरंटीसमोर काँग्रेसची ५० लाख रुपयांचा विमा आणि महिलांसाठी वर्षाला १० हजार रुपये देण्याची योजना व्यर्थ ठरली.

नेत्यांनी सुरू ठेवला ट्रेंड

भाजपच्या विजयानंतर नेत्यांनी एक्सवर पोस्ट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या. राजस्थानच्या जनतेने पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीवर विश्वास ठेवला. मी राजस्थानच्या सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. आमच्या कार्यकर्त्यांचेही आभार मानतो, ज्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले, असं राजस्थान भाजपचे अध्यक्ष सीपी जोशी म्हणाले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवर लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली, तीन राज्यांतील चार राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये भाजपची प्रचंड हॅट्ट्रिक ही प्रत्यक्षात 'जनतेच्या विश्वासाची हमी' ही मोदींची गॅरंटी आहे. या विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाच्या समर्पित कार्यकर्त्यांचे आणि आदरणीय मतदारांचे हार्दिक अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

भाजपचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटलं की, "मोदींची गॅरंटी." या पोस्टसोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धोतर आणि कुर्ता परिधान केलेले छायाचित्र टाकले आहे, ज्यामध्ये लिहिले आहे, "फक्त देशात एकच गॅरंटी चालते आणि ती म्हणजे मोदींची गॅरंटी.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही ट्विट करत मोदींची गॅरंटीचं ट्विट केलंय. त्यांनीही मोदींच्या गॅरंटीचा उल्लेख केलाय.

गॅरंटी बोले तो मोदी जी, पनौती बोले तो पप्पू जी !

मोदीजींच्या नेतृत्वाचा करिष्मा पुन्हा एकदा या निकालांनी सिद्ध केलाय. विरोधकांनी आकाश-पाताळ एक केलं; पण मोदीजींच्या जादूपुढे सारेच चीतपट झाले..

मोदी जींच्या पाठीशी तिन्ही राज्यातील लाडक्या बहिणी ठामपणे उभ्या राहिलेल्या आपल्याला पहायला मिळाल्या …

जानेवारीला भगवान श्रीराम मंदिरात विराजमान होणार आणि २०२४ च्या निवडणुकांनंतर मोदीजींच्या रूपानं पुन्हा रामराज्य येणार…!

असं ट्विट त्यांनी केलंय.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या. यासंदर्भात केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे. कंगना रनौतने आपल्या अधिकृत 'एक्स' म्हणजेच ट्विटर अकाऊंटवर तीन राज्यामध्ये सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ट्वीट केले. तिने पीएम मोदींचा फोटो शेअर करत त्यावर 'राम आए है!'असे लिहिले आहे.

PM  Modi
Chhattisgarh Election Results: भाजपचा पुढचा मुख्यमंत्री कोण? ओबीसी चेहरा की आदिवासी? कोणाची आहे चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com