UN Climate Summit: भारतात आयोजित होणार UN क्लायमेट समिट 2028? COP28 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी ठेवला प्रस्ताव

PM Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2038 मध्ये भारतात संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषद आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दुबई येथे झालेल्या COP28 शिखर परिषदेदरम्यान त्यांनी हा प्रस्ताव ठेवला आहे.
PM Narendra Modi On COP28 Climate Summit
PM Narendra Modi On COP28 Climate Summit Saam Tv

PM Narendra Modi On COP28 Climate Summit:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2038 मध्ये भारतात संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषद आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दुबई येथे झालेल्या COP28 शिखर परिषदेदरम्यान त्यांनी हा प्रस्ताव ठेवला आहे. यावेळी त्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारताने उचललेल्या पावलांचा उल्लेख केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत हा नेहमीच अर्थव्यवस्था आणि पर्यावरणातील समतोल राखणारा देश आहे. दुबईतील COP28 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आज भारताने जगासमोर अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाचा एक चांगला समतोल मांडला आहे. भारताची लोकसंख्या जगाच्या 17 टक्के इतकी आहे. तरीही कार्बन उत्सर्जनात आमचे योगदान केवळ 4 टक्के आहे.'  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Narendra Modi On COP28 Climate Summit
NCP News : बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही; अजित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर आव्हाडांचा हल्लाबोल

कार्बन उत्सर्जन कमी ठेवणाऱ्या जगातील काही अर्थव्यवस्थांपैकी भारत एक आहे. याशिवाय आम्ही पर्यावरणाच्या रक्षणासाठीच्या उपाययोजनांवरही चांगले काम करत आहोत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. (Latest Marathi News)

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारत संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीवर काम करण्यास तयार आहे. त्यामुळे 2028 मध्ये COP33 शिखर परिषद भारतात आयोजित करावी, असा आमचा प्रस्ताव आहे.'

PM Narendra Modi On COP28 Climate Summit
Uddhav Thackeray News: 'सरकार सगळं विकतंय, अन्नदात्याची ताकद दाखवून द्या..' उद्धव ठाकरेंचा घणाघात

एकूण कार्बन उत्सर्जन 45 टक्क्यांनी कमी करण्याचे भारताचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. 2030 पर्यंत हे लक्ष्य गाठण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की आम्ही जीवाश्म इंधनाचा वापर केवळ 50 टक्के मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर 2030 पर्यंत ते शून्यावर आणण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे आमचे लक्ष आहे.

या शिखर परिषदेत ब्रिटिश किंग चार्ल्स यांनी हवामान बदलाबाबत बोलताना भारत आणि पाकिस्तानमधील पुराचा उल्लेखही केला होता. हवामानातील मोठ्या बदलांमुळे अशा आपत्ती येत असल्याचे त्यांनी सांगितले. कॅनडा आणि अमेरिकेतील जंगलातील आगीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com