देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज समोर आला. या निकालानुसार भारतीय जनता पक्षाला छ्त्तीसगडमध्ये विजय मिळत असल्याचं दिसत आहे. भाजपने हा विजय कसा मिळवला आणि काँग्रेसचा पराभव कसा झाला यावर राजकीय विश्लेषक आपले मत मांडत आहेत. त्याचबरोबर भाजप कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री करणार याची चर्चा सुरू झालीय. तर मुख्यमंत्री पदाविषयीचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेतील, असे भाजपचे नेते सांगत आहेत. परंतु संभाव्य उमेदवारांबाबत आतापासूनच चर्चा सुरू झालीय. (Latest News)
हे नेते छत्तीसगडचे होऊ शकतात मुख्यमंत्री
विष्णू देव साई:
हे आदिवासी मतदारांचे महत्त्वाचे आहेत. जर भाजपने आदिवासी चेहरा निवडण्याचा निर्णय घेतला, तर पहिली पसंती विष्णू देव साई यांना असेल. साई हे भाजपचे माजी राज्यप्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत. विष्णू साई हे भाजपचे एक प्रमुख नेते आहेत. हे मोदींच्या पहिल्या मंत्रालयातील केंद्रीय पोलाद राज्यमंत्री राहिले होते. १६ व्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी रायगड मतदारसंघातून विजय मिळवला होता. खासदारकीसह त्यांनी विविध पदे भूषवली आहेत. २०२० ते २०२२ पर्यंत त्यांनी छत्तीसगड राज्याचे प्रदेशाध्यक्षपद भूषवले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रमन सिंग :
विष्णू देव साई यांच्यासह रमन सिंह यांच्याही नावाची चर्चा आहे. ते भाजपचे विद्यमान राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. तसेच ते २००४ पासून छत्तीसगड विधानसभेचे सदस्य आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.
रेणुका सिंह:
जर भाजप पक्ष श्रेष्ठींनी महिला उमेदवाराला मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला तर रेणुका सिंह यांना पसंती दिली जाईल. त्या भारताच्या आदिवासी व्यवहार राज्यमंत्री आहेत. आदिवासी समजातील लोकप्रिय नेत्या आहेत
रामविचार नेताम:
माजी राज्यसभा खासदार रामविचार नेताम यांनाही मुख्यमंत्री होण्याची संधी आहे. रमन सिंह यांच्या मंत्रिमंडळात रामविचार नेताम यांनी अनेक महत्त्वाची पदे भुषविले आहेत.
अरुण साहो : जर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री करण्याचं ठरवलं, तर अरुण साहो यांना पसंती दिली जाऊ शकते. बिलासपूर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार आहेत. सलग तीनवेळा ते खासदार म्हणून निवडून आलेत. तर ओबीसी समाजात त्यांचा मोठा प्रभाव आहे.
ओ. पी. चौधरी :
माजी आयएएस ऑफिसर असलेले ओपी चौधरी हे उपमुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.