Rajasthan Election Result 2023: राजस्थानमध्ये 30 वर्षांचा इतिहास बदलणार? भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत, कोण आघाडीवर?

Rajasthan BJP vs Congress Election Result 2023 Updates: राजस्थान विधानसभा 2023 निवडणुकीत सुरुवातीपासूनच भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरसीचा सामना रंगला आहे. मतमोजणीत कधी भाजप तर कधी काँग्रेस आघाडीवर येत आहे.
Rajasthan BJP vs Congress Assembly Election 2023 Who is Leading?
Rajasthan BJP vs Congress Assembly Election 2023 Who is Leading?Rajasthan BJP vs Congress Assembly Election 2023 Who is Ahead? - Saam TV
Published On

Rajasthan BJP vs Congress Election Result Updates:

राजस्थान विधानसभा 2023 निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासूनच भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरसीचा सामना रंगला आहे. मतमोजणीत कधी भाजप तर कधी काँग्रेस आघाडीवर येत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील नेत्यांची धाकधूक वाढली आहे.

राजस्थानमध्ये नेमकी कुणाची सत्ता येणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या २०० पैकी १९९ जागांसाठी २५ नोव्हेंबर रोजी ७५.४५ टक्के मतदान झाले होते. राजस्थानमध्ये निवडणुकीची एक वेगळीच परंपरा आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१९९३ पासून राज्यात कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा सरकार स्थापन करता आलेलं नाही. राजस्थानात दर ५ वर्षांनी सत्ताबदल पाहायला मिळतो. कधी भाजप तर कधी काँग्रेसचं सरकार सत्तेत येतं. (Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE)

२०१८ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष विजय झाला होता. त्यावेळी काँग्रेसने १०० जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला ७० जागा मिळाल्या होत्या. २०१८ मध्ये काँग्रेसला बहुमतासाठी त्यांना १ जागा कमी पडली होती.

त्यानंतर बसपा आणि अपक्ष आमदारांच्या मदतीने काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आता काँग्रेस सलग दुसऱ्यांदा विजय मिळवण्याच्या आशेने मैदानात उतरली आहे.  राजस्थान विधानसभा निवडणूक 2023 निकाल पाहण्याचे येथे क्लिक करा

Rajasthan BJP vs Congress Assembly Election 2023 Who is Leading?
2023 Rajasthan Assembly Election Results LIVE: खूप मेहनत करूनही आम्हाला यश मिळाले नाही - अशोक गेहलोत

सध्या मतमोजणीचे प्राथामिक कल हाती आले तेव्हा राजस्थानात काँग्रेस ८७ जागा, तर भाजप ९५ जागांवर आघाडीवर आहे. भाजपच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे झालरापाटन येथून ४ हजार मतांनी आघाडीवर आहे.

काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अशोक गेहलोत देखील सरदारपुरा मतदारसंघातून ४ हजार मतांनी आघाडीवर आहे. जन की बात, टाइम्स नाऊ ईटीजी, एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये भाजप १०० जागांचा आकडा गाठण्याचा अंदाज आहे.

तर काँग्रेसला ६० ते ८५ जागांपर्यंत जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एक्सिस माय इंडियाने काँग्रेस १०६ जागा पटकावू शकते असा अंदाज वर्तवला आहे.

Rajasthan BJP vs Congress Assembly Election 2023 Who is Leading?
BJP vs Congress: भाजपचा मास्टर प्लान तयार, ४ राज्यांच्या निकालाआधीच नवी रणनिती; काँग्रेसचं टेन्शन वाढणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com