PM Modi on Election Results: भाजपनं दिलेलं आश्वसन पूर्ण करण्याची गॅरंटी देतो; ३ राज्यांच्या निवडणूक निकालानंतर PM मोदींचं जनतेला वचन

PM Narendra Modi on Election Results 2023: या तिन्ही निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर लोकांचे आभार व्यक्त करण्यासाठी भाजपने सभा आयोजित केली आहे. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
PM Modi
PM ModiSaam tv
Published On

PM Narendra Modi on Election Results:

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. चार पैकी तीन राज्यांतील निवडणुकीत भाजपने विजयी आघाडी घेतली आहे. या तिन्ही निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर लोकांचे आभार व्यक्त करण्यासाठी भाजपने सभा आयोजित केली आहे. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. ': भाजपनं दिलेलं आश्वसन पूर्ण करण्याची गॅरंटी देतो. गॅरंटी पूर्ण करण्याचीही गॅरंटी देतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला वचन दिलं. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आज 'सबका साथ आणि सबका विकास' चा विजय आहे. आज विकसित भारताच्या जनतेचा विजय आहे. मी सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील लोकांचे आभार व्यक्त करतो. अशा निर्णयाने माझी जबाबदारी वाढते'.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Modi
Pm Narendra Modi: PM मोदींचं भाकीत खरं ठरलं, गेहलोत यांच्याबद्दल आधीच केलं होतं 'हे' वक्तव्य

'देशातील लोकांना जातीत विभागण्याचा प्रयत्न झाला. मी सांगितलं होतं की, देशात फक्त चार जाती महत्वाच्या आहेत. यात महिला, युवावर्ग, शेतकरी आणि गरीब कुटुंब या जातींचा समावेश आहे. या चार जातींनी देशाला सशक्त केलं आहे, असे ते म्हणाले.

'ओबीसी वर्ग याच वर्गातून येतो. आदिवासी वर्ग याच वर्गातून येतो. या चारही जातींनी भाजपला साथ दिली. या निवडणुकीत प्रत्येक गरीब जिंकला आहे. प्रत्येक वंचित, शेतकरी जिंकला आहे. या विजयात महिला स्वत:चा विजय पाहत आहे. हा युवा, नागरिकांचा विजय आहे, असंही ते म्हणाले.

PM Modi
MP Election BJP Victory : मध्य प्रदेशात भाजपला मिळाली 'लाडली' बहिणींची साथ, जाणून घ्या BJP च्या विजयाची 10 मोठी कारणे

'युवकांचा भाजपवर विश्वास वाढत आहेत. भाजपला त्यांच्या अपेक्षा समजतात. युवकांनाही माहीत आहे की, भाजप सरकार त्यांच्या विचार करते. भाजप सरकार युवकांसाठी नव्या संधी निर्माण करते, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com