‘शुद्धीकरण' ‘ही अस्पृश्यतेची मानसिकता! राहुल गांधींचा भाजप-RSSवर घणाघात; FIR दाखल करण्याची मागणी

‘Purification’ Ritual Sparks Controversy : हल्द्वानीतील कथित ‘शुद्धीकरण’ विधीवरून राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधलाय. ही अस्पृश्यतेच्या मानसिकतेचे दर्शन असल्याचा आरोप करत त्यांनी FIR दाखल करण्याची मागणी केली आहे.
‘Purification’ Ritual Sparks Controversy
Haldwani ‘shuddhikaran’ Row Rahul Gandhi Attacks Bjp-rss, Demands Firsaam tv
Published On
Summary
  • हल्द्वानीतील कथित ‘शुद्धीकरण’ विधीवरून राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.

  • राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • अशा प्रकारच्या विधींमधून अस्पृश्यतेची मानसिकता दिसून येत असल्याचा राहुल गांधींचा आरोप

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची रॅली झाल्यानंतर कथित 'शुद्धीकरण' विधी करण्यात आला होता, त्यावरून राहुल गांधींनी भाजप सरकार आणि आरएसएसवर टीका केलीय.

‘Purification’ Ritual Sparks Controversy
बंडखोर खासदारांच्या गटाला भाजपचा 'दे धक्का'; राजकीय वर्तुळात खळबळ

असे शुद्धीकरणाचे विधी करण्यात येत असील तर हे अस्पृश्यतेच्या मानसिकतेचे दर्शन घडवतात, ज्या मानसिकतेला भारतीय संविधानाने गुन्हा ठरवलंय, असा आरोप राहुल गांधींनी केलाय. राहुल गांधी यांनी म्हटलंय की, सध्या देशात दोन विचारसरणींमध्ये संघर्ष सुरू आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप सरकारला इशारा दिलाय. तसेच हल्द्वानी येथील घटनेबाबत लवकरात लवकर एफआयआर (FIR) दाखल केला जावा, अशी मागणी केली.

'शुद्धीकरणा'वरून भाजप-आरएसएसवर टीका

एका बाजूला संविधान आणि डॉ. भीमराव आंबेडकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व सरदार पटेल यांची विचारसरणी आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) विचारसरणी असल्याचं राहुल गांधी यावेळी म्हणालेत. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, "जेव्हा राजस्थानमधील एखाद्या मंदिरात आमचे काँग्रेस अध्यक्ष खर्गे हे जातात, तेव्हा भाजप नेते 'शुद्धीकरणा'चा विधी करतात.

‘Purification’ Ritual Sparks Controversy
६ बंडखोर खासदार,५० टक्क्यांहून अधिक आमदार NDAची साथ सोडणार; मोठा राजकीय भूकंप होणार? बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

खर्गे यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश आणि संविधानासाठी समर्पित केलंय. ते जेव्हा हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर भाषण देण्यासाठी जातात, तेव्हा तिथेही 'शुद्धीकरण' केले जाते." आरएसएस आणि भाजपचे लोक अशी कामे करतात. पण हे 'शुद्धीकरण' प्रत्यक्षात अस्पृश्यतेचेच दुसरे नाव आहे. राहुल गांधी म्हणाले की, संविधानाने अस्पृश्यता नष्ट केलंय, तरीही भाजपचे नेते कार्यकर्त उघडपणे त्याचे पालन करतात. जेव्हा एखाद्या ठिकाणी दलित व्यक्तीच्या भेटीनंतर ते ठिकाण 'शुद्ध' केलं जातं.

अशा घटनेतून दलितांनी स्पर्श करू नये किंवा ते अशुद्ध आहेत असा संदेश जात असतो. मात्र, हल्द्वानी प्रकरणाबाबत भाजपने या आरोपापासून स्वतःला दूर ठेवलंय. पंतप्रधान स्वत: ला सर्व जातीचा मानतात,परंतु त्यावर काही बोलत नाहीत. दरम्यान भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या घटनेचा याआधीच निषेध केला होता. भाजप अशा कृत्यांचे समर्थन करत नाही आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासनही त्यांनी त्यावेळी दिले होते.

शुद्धीकरणा'च्या प्रकरणात एफआयआर दाखल करा

राहुल गांधी यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले पाहिजेत. या गुन्ह्यातील दोषींविरुद्ध एफआयआर दाखल होईल, यासाठी काँग्रेस पक्षाकडून पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितलंय. देशात संविधान लागू असूनही दलितांविरुद्ध भेदभाव आणि हिंसाचार होत आहेत. जे कायदेशीररीत्या गुन्हे आहेत, ते सुरूच असल्याचा आरोप त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com