

तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी एनडीएबाबत मोठा दावा केला.
सहा बंडखोर खासदार आणि ५० टक्क्यांहून अधिक आमदार आघाडी सोडू शकतात.
हे सर्व नेते ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात
राजकारणातील सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. बंडखोर ६ खासदार आणि ५० टक्क्याहून अधिक आमदार एनडीएमधून बाहेर पडणार आहेत. पुढील काही दिवसात देशाच्या राजकारणात मोठा भूकंप होईल, अशी शक्यता एका ज्येष्ठ नेत्यानं वर्तवलीय. या ज्येष्ठ नेत्याच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.
तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुणाल घोष यांनी हा खळबळजनक दावा केलाय. भाजपच्या आघाडीतून बाहेर पडण्यास काही आमदार-खासदार तयार असल्याचा दावा घोष यांनी केलाय. एनडीएमध्ये गेलेले ६ बंडखोर खासदार आणि ५० टक्क्याहून अधिक आमदार परत पुन्हा पक्षात येणार असल्याचा दावा घोष यांनी केलाय.
हे सर्व बंडखोर आमदार थेट पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात आहेत. या बंडखोर नेत्यांना पक्षात परतण्यापासून रोखण्यासाठी पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. यामागे भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोपही घोष यांनी केला.
माध्यमांशी बोलताना कुणाल घोष म्हणाले, "६ खासदार आणि ५० टक्क्यांपेक्षा जास्त आमदार थेट ममता दीदींच्या संपर्कात आहेत. मी सध्या त्यांची नावे आणि अचूक आकडेवारी जाहीर करणार नाही, मला याचा राजकीय फायदा दुसऱ्यांनी उचलावा असे वाटत नाही. सध्या पोलिसांचा चुकीचा वापर केला जात असून लोकप्रतिनिधींवर दबाव टाकण्यात आला असल्याचा आरोप घोष यांनी केला. जर पोलिसांचा हा दबाव अवघ्या एका दिवसासाठी जरी हटवला, तर आम्ही पुढील २४ तासांच्या आत ५६ ते ५८ आमदारांची मोठी रॅली काढून दाखवू शकतो, असेही ते म्हणाले.
मे २०२६ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या भीषण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये पक्षावरील वर्चस्वावरून मोठा संघर्ष सुरू आहे. बंडखोर ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा एक मोठा गट पक्षापासून वेगळा झाला आहे. त्यांना विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून मान्यताही मिळाली आहे. विशेष म्हणजे बंडखोरी आधीच बॅनर्जी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.