

उद्धव ठाकरेंच्या पक्षतील नेत्यांची ऑऊट गोइंग काही करता कमी होताना दिसत नाहीये. वाशिमनंतर आता कल्याणमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. येथील श्रीकांत शिंदेना लोकसभेत आव्हान देणाऱ्या वैशाली दरेकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय. दरम्यान गेल्याच महिन्यात ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत ठाकरेंच्या ६ खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन करत उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला होता.
आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या वैशाली दरेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. वैशाली दरेकर यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. वैशाली दरेकर आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा सुरू झालीय. मात्र . मात्र, आता वैयक्तिक कारणास्तव आपण पक्षाच्या कामाला वेळ देऊ शकत नसल्याने पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभा जिल्हा महिला संघटक पदाचा दरेकर-राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वैशाली दरेकर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात उबाठामधून उमेदवारी घेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. दरेकर यांनी आपल्या राजीनामा उद्धव ठाकरेंकडे पाठवला असून त्यात त्यांनी पक्ष सोडण्याचं कारण सांगतिलयं. पक्षाच्या कामाला वेळ देऊ शकत नसल्याने पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटलंय.
''साहेब, मी वैशाली दरेकर राणे, महिला जिल्हासंघटक या पदावर दोन वर्षापासून कार्यरत आहे. परंतु सध्या माझ्या वैयक्तिक कर्तव्यांमुळे मी सदर पदाला न्याय आणि वेळ देऊ शकत नाही. म्हणून माझ्या महिला जिल्हा संघटक या पदाचा मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे, त्याचा स्वीकार करावा ही विनंती,'' असा असं त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.