Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! विदर्भातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Washim Politics UBT Leader Join BJP : वाशिम येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत विविध संघटना आणि राजकीय पक्षांमधील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे पक्षाला संघटनात्मक पातळीवर मोठी बळकटी मिळाली.
Uddhav Thackeray Faces Major Setback As Hundreds Of Leaders And Workers Join Bjp In Washim
Uddhav Thackeray Faces Major Setback As Hundreds Of Leaders And Workers Join Bjp In Washimsaam tv
Published On
Summary
  • भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नव्या सदस्यांचे पक्षात स्वागत केले.

  • विविध संस्था, समित्या आणि राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी भाजपची वाट धरली.

  • या घडामोडीमुळे वाशिम जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता

राम मंदिर चोरी प्रकरण, नीट पेपरफुटीवरून भाजपवर हल्लाबोल करणाऱ्या उद्धव ठाकरेंना वाशिममध्ये मोठा फटका बसला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर, मनोरा भागातील विविध संस्था, समित्यांच्या पदाधिकाऱ्यांसह वेगवेगळ्या पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी आमदार शामभाऊ खोडे, आमदार सईताई डहाके, भाजप जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, भाजपा प्रदेश कार्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे उपस्थित होते.

Uddhav Thackeray Faces Major Setback As Hundreds Of Leaders And Workers Join Bjp In Washim
मोठी बातमी! निवडणूक आयोगाचं सुनेत्रा पवार यांना पत्र; राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार?

यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 'सब का साथ सब का' या न्यायाने शेतकरी, कष्टकरी अशा तळागाळातील प्रत्येकाच्या जीवनात कसा आनंद निर्माण होईल याचा विचार होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वीजबिल थकबाकी माफ केली.

राज्यातील सर्व शेतजमीन ओलिताखाली आली पाहिजे याचा विचार हे सरकार करते. तर सहकार क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे पाठबळ आहे. त्यामुळे सामाजिक जाण आणि अनुभव असणारा प्रत्येक कार्यकर्ता भाजपात दाखल होत आहे आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Uddhav Thackeray Faces Major Setback As Hundreds Of Leaders And Workers Join Bjp In Washim
Maharashtra Politics: धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला मिळणार? पक्ष बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आमदार शामभाऊ खोडे म्हणाले, राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास असल्याने हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. सर्वाना एकत्र घेऊन पुढील वाटचाल होणार आहे. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेवराव काकडे, उपसभापती गोवर्धन चव्हाण, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख विजय खानजोळे, सभापती पंचायत समिती तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भास्कर शेगीकर, जिल्हा परिषद माजी सदस्य भाऊराव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग कोठाळे, सचिन डाफेकर, विश्वासभाऊ गोदमले, एन.डी. राठोड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक आणि राज्य मार्केटिंग फेडरेशनचे संचालक सुरेश गावंडे, जिल्हा परिषद माजी सदस्य उमेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि राष्ट्रवादी आणि उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com