

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचा भडका
भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये वाद पेटला
हावड्यात बॉम्बस्फोट आणि दगडफेकीच्या घटना घडल्या
१०० हून अधिक कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तणावाचे वातावरण आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर आता हावडामध्ये बॉम्बस्फोटाची घटना उघडकीस आली. टीएमसीने भाजप नेत्यावर बॉम्ब फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत १०० जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये अनेक दुकानांची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. घरांवर दगडफेक करण्यात आली. हावडा जिल्ह्यातील शिवपूर परिसरात बॉम्बस्फोट करण्यात आला. या स्फोटात भाजप आणि टीएमसीचे १०० कार्यकर्ते जखमी झाले. हा बॉम्बस्फोट भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादातून झाल्याचे सांगितले जात आहे.
हावडामध्ये ७ बॉम्ब फेकण्यात आले. या हिंसाचारानंतर, परिसर शांत करण्यासाठी घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे नेते मनोज खान यांच्यावर बॉम्ब फेकल्याचा आरोप केला जात आहे. दुकानांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपने या हिंसाचारासाठी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे. या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
टीएमसी समर्थकांनी भाजप कार्यकर्त्यांवर कच्च्या बॉम्बने हल्ला केला. या घटनेत भाजपचे कार्यकर्ते जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला आहे. घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. रॅपिड ॲक्शन फोर्स घटनास्थळी तैनात करण्यात आले.
शिबपूरच्या चौरा बस्ती परिसरात भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये कथितरित्या झालेल्या हल्ल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हावडा शहर पोलिस आयुक्त अखिलेश चतुर्वेदी यांनी या घटनेवर निवेदन जारी केले आहे. पोलिस आयुक्तांनी सांगितले की, हा एक राजकीय संघर्ष होता ज्यामध्ये अनेक जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत सहभागी असलेल्या सर्वांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.