West Bengal Result: निकाल जाहीर होताच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उसळला, TMC चे कार्यालय जाळले; भाजपवर होतोय आरोप

West Bengal TMC Office Fire: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच हिंसाचार उसळला आहे. चुरूलिया परिसरात तृणमूल काँग्रेसचे कार्यालय जाळण्यात आले. टीएमसीच्या नेत्यांनी भाजपवर आरोप केले.
West Bengal Result: निकाल जाहीर होताच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उसळला, TMC चे कार्यालय जाळले; भाजपवर होतोय आरोप
West Bengal TMC Office FireSaam Tv
Published On

Summary:

  • पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर

  • निवडणूक निकाल लागताच हिंसाचार उसळला

  • चुरूलिया परिसरात तृणमूल काँग्रेसचे कार्यालय जाळण्यात आले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच हिंसाचार उसळला आहे. सोमवारी जामुरिया विधानसभा मतदारसंघात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. जामुरियाच्या चुरूलिया परिसरात तृणमूल काँग्रेसचे कार्यालय जाळण्यात आले. या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली असून परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. याआधी टीएमसीच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी मतमोजणी सुरू असताना चुरुलिया येथील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयातून अचानक आग लागली. संपूर्ण कार्यालय तात्काळ रिकामं करण्यात आले. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही घटना जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा थेट आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. संभाव्य हिंसाचार टाळण्यासाठी सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.

West Bengal Result: निकाल जाहीर होताच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उसळला, TMC चे कार्यालय जाळले; भाजपवर होतोय आरोप
West Bengal Next CM: पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? ममता बॅनर्जींच्या एकेकाळच्या विश्वासू नेत्याचं नाव आघाडीवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com