BJP: मतमोजणी बाकी, पण अभिनंदन सुरू, भाजपला फुल कॉन्फिडन्स...; पोस्टरबाजीमुळे राहुरीच्या विजयाची पुण्यात चर्चा

Pune BJP Candidate Akshay Kardile Posters: राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या अक्षय कर्डिले यांचे विजयी झाल्याचे बॅनर्स पुण्यामध्ये झळकले आहेत. मित्रा आमदार झाल्याबद्ल हार्दिक अभिनंदन या आशयाचे बॅनर्स पुण्यात लावण्यात आलेत.
BJP: मतमोजणी बाकी, पण अभिनंदन सुरू, भाजपला फुल कॉन्फिडन्स...; पोस्टरबाजीमुळे राहुरीच्या विजयाची पुण्यात चर्चा
Pune BJP PostersSaam Tv
Published On

Summary -

  • निकालाआधीच पुण्यात विजयाचे बॅनर्स झळकले

  • भाजपचा फुल कॉन्फिडन्स दिसून आला

  • राहुरीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर्स चर्चेत

  • राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचा निकाल उद्या होणार जाहीर

सागर आव्हाड, पुणे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आता उद्या या दोन्ही ठिकाणचा निकाल लागणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीमधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात आहेत. तर दुसरीकडे दिवंगत आमदार कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले राहुरी विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवत आहेत.

या दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला उद्या सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होणार असून दुपारी बारापर्यंत निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, निकालाच्या आदल्या दिवशीच पुणे शहरात लागलेल्या फ्लेक्स आणि होर्डिंग्जमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. निकाल लागण्यापूर्वीच पुण्यामध्ये अक्षय कर्डीले विजयी झाल्याचे बॅनर झळकले. भाजपकडून राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या अक्षय कर्डिले यांना विजयाबाबत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पुण्यातील नगर रोड परिसरात “मित्र अभिनंदन आमदार झाल्याबद्दल” अशा मजकुराचे बॅनर्स झळकत आहेत.

BJP: मतमोजणी बाकी, पण अभिनंदन सुरू, भाजपला फुल कॉन्फिडन्स...; पोस्टरबाजीमुळे राहुरीच्या विजयाची पुण्यात चर्चा
Rahuri Election : राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच! भाजप-शरद पवार गटात मुख्य लढत, हे ७ उमेदवार रिंगणात, VIDEO

हे फ्लेक्स सुधीर वाघमोडे मित्र परिवार यांच्या वतीने लावण्यात आल्याचे त्यावर नमूद करण्यात आले आहे. निकाल अद्याप अधिकृतरीत्या जाहीर होण्यापूर्वीच असे अभिनंदनपर बॅनर्स लावले गेल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून हा प्रकार चर्चेचा विषय ठरत आहे. कारण हा मतदारसंघ पुण्यापासून साधारण १५० ते १८० किलोमीटर अंतरावर असून देखील या विजयाचा विश्वास पुण्यातील भाजपाला वाटत असल्याचं पाहायला मिळत आहे.

BJP: मतमोजणी बाकी, पण अभिनंदन सुरू, भाजपला फुल कॉन्फिडन्स...; पोस्टरबाजीमुळे राहुरीच्या विजयाची पुण्यात चर्चा
Rahuri Election : राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच! भाजप-शरद पवार गटात मुख्य लढत, हे ७ उमेदवार रिंगणात, VIDEO

तर दुसरीकडे, बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे फक्त चर्चाही त्यांच्या ऐतिहासिक विजयाची होताना पाहायला मिळत आहे. त्या किती मोठे मताधिक्य घेऊन विजयी होणार याबाबतच्या चर्चा सध्या बारामतीच्या वर्तुळात पाहायला मिळत आहे. उद्या निकाल नेमका काय लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

BJP: मतमोजणी बाकी, पण अभिनंदन सुरू, भाजपला फुल कॉन्फिडन्स...; पोस्टरबाजीमुळे राहुरीच्या विजयाची पुण्यात चर्चा
Baramati-Rahuri Exit Poll: बारामती अन् राहुरीचा एक्झिट पोल आला समोर, कोण निवडून येणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com