Baramati-Rahuri Exit Poll: बारामती अन् राहुरीचा एक्झिट पोल आला समोर, कोण निवडून येणार?

Sunetra Pawar And Akshay Kardile: बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला असून यामध्ये महायुतीचा विजय होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बारामतीत सुनेत्रा पवार आणि राहुरीत अक्षय कर्डिले निवडून येण्याची शक्यता आहे.
Baramati-Rahuri Exit Poll: बारामती अन् राहुरीचा एक्झिट पोल आला समोर, कोण निवडून येणार?
Sunetra Pawar And Akshay KardileSaam Tv
Published On

Summary -

  • बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर

  • दोन्ही ठिकाणी महायुतीचा विजय होण्याची शक्यता

  • सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले हे निवडून येणार

  • बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले

संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वी एक्झिट पोल समोर आला आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर महायुतीचे पारडं जड असून महायुतीचा विजय होणार असल्याचा प्राथमिक अंदाज एक्झिट पोलमध्ये नमूद करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना मतदारांनी कौल दिला आहे. बारामतीतून सुनेत्रा पवार आणि राहुरीतून अक्षय कर्डिले मोठ्या मतधिक्याने विजयी होणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे.

बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विराट विजय होण्याची शक्यता आहे. रिंगसाईड रिसर्च या संस्थेचा एक्झिट पोलनुसार, बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना भरघोस मतदान केलं. सुनेत्रा पवार यांना ९१ ते ९७ टक्के मतदान मिळण्याचा अंदाज आहे. तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांना ७८ ते ८३ टक्के मतदारांनी मतदान केले. तर त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या शरद पवार गटाच्या गोविंद मोकाटे यांना फक्त ७ ते ९ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे . वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांना ३ ते ५ टक्के, तर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना ४ ते ६ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार दोन्ही ठिकाणी महायुतीचाच विजय होणार असल्याचे निश्चित आहे.

Baramati-Rahuri Exit Poll: बारामती अन् राहुरीचा एक्झिट पोल आला समोर, कोण निवडून येणार?
Saam Exit Poll : ठाकरेंना धक्का की काँग्रेसची मुसंडी? १२ जिल्हा परिषदांच्या एक्झिट पोलची संपूर्ण आकडेवारी

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिकामी झाली होती. या जागेसाठी अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आले. त्यांच्याविरोधात काँग्रेससह ५६ उमेदवारांनी अर्ज केला होता. यामधील अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. याठिकाणी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात २१ उमेदवारांनी निवडणूक लढवली. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ५७.४८ टक्के मतदान झाले होते. बारामतीत ६१.६१ टक्के पुरुष मतदारांनी तर ५३.२९ टक्के महिला मतदारांनी आणि ४.४८ टक्के तृतीयपंथी मतदारांनी मतदान केले होते.

Baramati-Rahuri Exit Poll: बारामती अन् राहुरीचा एक्झिट पोल आला समोर, कोण निवडून येणार?
पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता; ममतांना झटका; EXIT POLL च्या अंदाजामुळं देशाच्या राजकारणात खळबळ

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या ठिकाणी महायुतीकडून शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिलेला उमेदवारी दिली होती. याठिकाणी अक्षय कर्डिले यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यात लढत झाली होती. राहुरीमध्ये ५५.३१ टक्के मतदान झाले होते. राहुरीत ५८.५९ टक्के पुरुषांनी तर ५१.८० टक्के महिला मतदारांनी मतदान केलं होतं.

Baramati-Rahuri Exit Poll: बारामती अन् राहुरीचा एक्झिट पोल आला समोर, कोण निवडून येणार?
पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता; ममतांना झटका; EXIT POLL च्या अंदाजामुळं देशाच्या राजकारणात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com