पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता; ममतांना झटका; EXIT POLL च्या अंदाजामुळं देशाच्या राजकारणात खळबळ

West Bengal Exit Poll Results 2026 BJP vs TMC: पश्चिम बंगालमध्ये मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला आघाडी मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता असून राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत.
Voters queue up during West Bengal Assembly elections as exit polls predict a tight contest between BJP and TMC.
Voters queue up during West Bengal Assembly elections as exit polls predict a tight contest between BJP and TMC.saam tv
Published On

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधूमाळीत अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक मानल्या जाणाऱ्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज बुधवारी मतदान पार पडले. या टप्प्यात राज्यातील एकूण 294 जागांपैकी उरलेल्या 142 जागांसाठी मतदान झाले असून बंगालच्या दक्षिण भागात बालेकिल्ल्यामध्य आपले वर्चस्व टिकवण्यासाठी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत सुरू होती.

Voters queue up during West Bengal Assembly elections as exit polls predict a tight contest between BJP and TMC.
Exit Polls: पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार येणार? ४ राज्यात भाजप तर एका राज्यात काँग्रेसची सत्ता, जाणून घ्या एक्झिट पोल

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात देखील 90 टक्क्याहून अधिक मतदान झाल्याने बंगाल विधानसभेवर कोणता पक्ष झेंडा फडकवणार याची उत्कंठा लागली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी भाजपने मोठी कंबर कसली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे त्याठिकाणी तळ ठोकून होते.

Voters queue up during West Bengal Assembly elections as exit polls predict a tight contest between BJP and TMC.
मुंबईत BCCIच्या ब्रॉडकास्ट इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू; IPLसाठी आला होता भारतात|VIDEO

मतदानावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार, जाळपोळीच्या घटना घडल्या. भाजपच्या अनेक उमेदवारांवर हल्ला देखील झाल्याने तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलेच घमासान झाले. विशेष म्हणजे या टप्प्यातील सर्वात लक्षवेधी लढत भवानीपुर मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षेनेते सुवेंदु अधिकारी हे निवडणुकीच्या रणभूमीत आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील तृणमूलवर जोरदार निशाणा साधत ममता बॅनर्जी यांच्यावर टिकास्त्र सोडले होते. काँग्रेस नेत्याची हत्या केल्याचा आरोप देखील तृणमूलवर राहुल गांधी यांनी लावला होता.

Voters queue up during West Bengal Assembly elections as exit polls predict a tight contest between BJP and TMC.
Pawan Khera House Raid : काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या घरावर छापेमारी; विधानसभा निवडणुकीआधी मोठी कारवाई; हैदराबादला पळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

दरम्यान आज मतदान पूर्ण झाले असून एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात असून ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे.

एक्झिट पोलची आकडेवारी खालीलप्रमाणे

पश्चिम बंगाल -294/294

तृणमूल काँग्रेस - 138

भाजप - 151

काँग्रेस - 2

डावे -00

इतर - 3

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com