

पाच राज्यांच्या निवडणुकीसाठी एक्झिट पोल जाहीर
भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये प्रमुख लढत
केरळ, आसाम, पुदुचेरीतही निकालावर नजर
चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यासाठी आज मतदान संपले आहे. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. भाजपनं बंगालमधील सत्ता उलथवून लावण्यासाठी मोठी ताकद लावली आहे. भाजप आपल्या रणनीतीमध्ये विजयी होईल का? का तृणमूल काँग्रेस आपली सत्ता अबाधित ठेवण्यात यशस्वी होणार हे एक्झिट पोलमधून सिद्ध होईल. विजय द्रमुक-एआयएडीएमकेला झटका देतील का? केरळ, पुदुचेरी आणि आसामवर याचे काय परिणाम होतील? हे जाणून घेऊ.
आसाम, केरळ आणि पुदुचेरीमध्ये ९ एप्रिल रोजी मतदान झाले, तर तामिळनाडूमध्येही २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. बंगालमध्ये दोन टप्प्यांपैकी पहिला टप्पा २३ एप्रिल रोजी पार पडला असून मतदानाचा दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडलं. सायंकाळी ६ वाजता मतदान संपल्यानंतर लगेचच, सायंकाळी ६:३० वाजता एक्झिट पोलचे निकाल येऊ लागतील.
४ मे रोजी होणाऱ्या अधिकृत मतमोजणीपूर्वीच, एक्झिट पोलचे सुरुवातीचे अंदाज विविध पक्षांची कामगिरी कशी असेल याची एक ढोबळ कल्पना देत आहेत. यावेळी जनतेने निवडणुकीत उत्साहाने सहभाग घेतला असून अनेक राज्यांमध्ये विक्रमी मतदान झाले आहे. याचाच परिणाम आपल्याला एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.
MATRIZE चा एक्झिट पोलने आसामची आकडेवारी सर्वप्रथम जाहीर केली आहे. एक्झिट पोलच्या निकालांनुसार, आसाममधील १२६ जागांपैकी भाजपला ८५ ते ९५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला २५ ते ३२ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांना ६ ते १२ जागा मिळू शकतात. एक्झिट पोलचे निकाल आहेत, निवडणुकीचे प्रत्यक्ष निकाल ४ मे रोजी जाहीर केले जातील.
AXIS MY INDIA एक्झिट पोल निकाल: आसाममध्ये एनडीएला बहुमत
AXIS MY INDIA च्या एक्झिट पोलनुसार, आसाममध्ये एनडीए पुन्हा सरकार स्थापन करेल असा अंदाज आहे. या अंदाजानुसार एनडीएला ८८ ते १०० जागा मिळण्याचा अंदाज आहे.
चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार, पश्चिम बंगाल मध्ये सत्ता बदल होणार आहे. पोलनुसार भाजपला १५०- १६० जागा मिळतील. तर सत्ताधारी टीएमसीच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे, ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला १३० ते १४० जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र येथे काँग्रेसचा पराभव होईल असा अंदाज चाणक्य एक्झिट पोलने वर्तुवला आहे.
पिपल्स इनसाईटच्या एक्झिट पोलनुसार, येथे सत्तेत उलथापालथ होणार आहे. येथे काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे. युडीएफला ६६-७६ जागा तर एलडीएफ 58-68 एनडीए - 0-4
मॅट्रिझने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके+ आघाडी २३४ जागांच्या तामिळनाडू विधानसभेत पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत दिसत आहे. पोलच्या अंदाजानुसार, DMK+ १२२ ते १३२ जागा, NDA ला ८७ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अभिनेता विजयच्या पार्टी TVK ला १० ते १२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना ० ते ६ जागा मिळतील.
Puducherry Exit Poll
३० जागांवर एनडीए आणि सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स यांच्यात लढत
पुडुचेरीमध्ये एनडीए आणि सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.