Pakistan Violence: खामेनींच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये हिंसाचार, आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू

Irans Supreme Leader Ayatollah Ali Khamenei Death: इराणचे सर्वोच्च नेते खामेनींच्या मृत्यूनंतर पाकिस्तानाताली शिया समुदाय आक्रमक झाला. त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पाकिस्तानमध्ये हिंसाचाराची घटना यामध्ये ३५ जणांचा मृत्यू झाला.
Pakistan Violence: खामेनींच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये हिंसाचार, आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू
Saam Tv
Published On

Summary -

  • इराण आणि इस्राइल यांच्यातील युद्धानंतर पाकिस्तानमध्ये हिंसाचार उसळला

  • खामेनी यांच्या मृत्यूनंतर शिया समुदायाने मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली

  • कराचीतील अमेरिकन दूतावासावर हल्ला करण्यात आला

  • आतापर्यंत पाकिस्तानमध्ये हिसांचाराने ३५ नागरिकांचा मृत्यू झाला

इराण-इस्राइल या देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला. इस्राइलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा मृत्यू झाला. खामेनींच्या मृत्यूनंतर पाकिस्तानातील शिया समुदाय संतप्त झाला आहे. खामेनींच्या मृत्यूची बातमी समोर येताच पाकिस्तानातील कराचीमध्ये हिंसाचार उसळला. संतप्त जमावाने कराचीमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला करत तोडफोड केली आणि आग लावली. यादरम्यान पोलिस आणि आंदोलक आमने सामने आले. पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. कालपासून पाकिस्तानच्या कराचीमधील परिस्थिती गंभीर आहे. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला.

या हिंसाचाराच्या घटनेनंतर अमेरिकन दूतावासाने सर्व व्हिसा अपॉइंटमेंट रद्द केल्या आहेत. अमेरिकन दूतावासाचे काम ठप्प झाले आहे. जर्मन दूतावासाचे कामही ठप्प झाले आहे. अनेक शहरांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. कराची, इस्लामाबाद आणि लाहोर व्यतिरिक्त गिलगिटमध्ये जमावाकडून अमेरिकेविरुद्ध निदर्शने सुरू आहेत. हिंसाचाराची परिस्थिती गंभीर होत असल्यामुळे गिलगिटमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. नागरिक रस्त्यावर उतरले आहेत त्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.

Pakistan Violence: खामेनींच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये हिंसाचार, आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू
Iran-Israel War: युद्धादरम्यान PM मोदींचा थेट नेतान्याहूंना फोन, नेमकी काय चर्चा झाली? भारतात मोठी बैठक

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर पाकिस्तानमधील शिया समुदाय रस्त्यावर उतरला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. अमेरिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. शिया मुस्लिम खामेनींना धार्मिक आणि राजकीय नेते मानतात. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे संतप्त होऊन पाकिस्तानातील शिया समुदाय आक्रमक झाला आहे. कराचीतील अमेरिकन दूतावासाबाहेर जमत या सर्वांनी 'अमेरिका मुर्दाबाद' आणि 'इस्रायल मुर्दाबाद'च्या घोषणा देत निदर्शकांनी अमेरिकन दूतावासात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

Pakistan Violence: खामेनींच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये हिंसाचार, आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू
Iran-Israel War: युद्धादरम्यान PM मोदींचा थेट नेतान्याहूंना फोन, नेमकी काय चर्चा झाली? भारतात मोठी बैठक

दूतावासात तैनात असलेल्या अमेरिकन सैन्याने आणि सुरक्षा दलांनी संतप्त आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते संतप्त झाले. त्यानंतर जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यांनी रबर बुलेट्सचा देखील वापर केला. परिस्थिती नियंत्रणात न आल्याने त्यांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात कराचीमध्ये सुमारे १६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर इस्लामाबादमध्येही हिंसक निदर्शने आणि जाळपोळीच्या घटना घडल्या या घटनांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. पाकिस्तानमध्ये झालेल्या या हिंसाचारात आतापर्यंत ३५ नागरिकांचा मृत्यू झाला.

Pakistan Violence: खामेनींच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये हिंसाचार, आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू
Israel Iran War : इस्रायल-इराण युद्धादरम्यान UAE मध्ये अडकली अक्षय कुमारची हिरोईन, पोस्ट करत म्हणाली- "भयानक परिस्थिती, मला घरी जायचे..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com