

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शर्यत
अग्निमित्रा पॉल यांची अचानक एन्ट्री
दिल्ली भेटीनंतर चर्चांना उधाण
सुवेंदू अधिकारी अजूनही प्रबळ दावेदार
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दिग्गजांची नावं चर्चेत आहेत. अशातच पश्चिम बंगालमध्ये भाजप धक्कातंत्र देण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अचानक एका महिला नेत्याची एन्ट्री झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी सुवेंदु अधिकारी हे प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यांच्यासोबतच मुख्यमंत्रिपदासाठी अनेकांची नावं देखील घेतली जात आहेत. त्यामध्येच आता अग्निमित्रा पॉल यांची एन्ट्री झाली आहे. त्या दिल्लीमध्ये गेल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निमित्रा पॉल मंगळवारी दिल्लीमध्ये गेल्या होत्या. त्यांनी पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली त्यानंतर त्या कोलकात्याला परतल्या. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची देखील भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री कोण होणार हे सांगणे आणखी कठीण झाले आहे. सुवेंदू अधिकारी यांच्यानंतर आता अग्निमित्रा पॉल यांच्या नावाची जास्त चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे आता भाजप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदासाठी दोघांपैकी कुणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशी देखील माहिती समोर आली आहे की, भाजप पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी महिला नेत्याला संधी देण्याच्या तयारीत आहे. या पदासाठी अग्निमित्रा पॉल यांच्या नावाला जास्त पसंती आहे. तर दुसरीकडे भाजपचे वरिष्ठ नेतृत्व इतर अनेक नावांचाही विचार करत आहे. भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन्ही ठिकाणी यशस्वी ठरल्यामुळे सुवेंदू अधिकारी या शर्यतीत आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव त्यांच्याच बालेकिल्ल्यात केल्या.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी अनेक नेते उत्सुक आहेत. सुवेंदू अधिकारी आणि अग्निमित्र पॉल यांच्या पाठोपाठ दिलीप घोष यांचे नावही शर्यतीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप घोष हे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्याही संपर्कात आहेत. बंगाल भाजपचे विद्यमान अध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांचेही नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. सामिक भट्टाचार्य हे बंगालमधील भाजपच्या बहुतांश नेत्यांची पसंती आहेत. त्यासोबत स्वपन दासगुप्ता यांच्याही नावाची चर्चा होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.