West Bengal: पश्चिम बंगालमध्ये राजकीय तणाव वाढला, भाजप कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यालयावर बुलडोझर फिरवल्याचा आरोप; VIDEO समोर

TMC Office Vandalism: पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर राजकीय तणाव आणखी वाढला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून टीएमसी कार्यालयावर हल्ले सुरूच आहे. भाजप कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यालयावर बुलडोझर फिरवल्याचा आरोप केला जात आहे.
West Bengal: पश्चिम बंगालमध्ये राजकीय तणाव वाढला, भाजप कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यालयावर बुलडोझर फिरवल्याचा आरोप; VIDEO समोर
TMC Office VandalismSaam Tv
Published On

Summary -

  • पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर तणाव वाढला

  • टीएमसीकडून भाजप कार्यालयावर बुलडोझर फिरवल्याचा आरोप

  • कोलकात्यातील न्यू मार्केट परिसरात तोडफोड केल्याचा दावा

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही तणाव वाढत चालला आहे. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपला टीएमसीचा पराभव करत सत्ता मिळवण्यात यश आले. या यशानंतर आता भाजपचे समर्थक बुलडोझर कारवाई करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी पक्षाने केला आहे. यामुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी कोलकाता येथील न्यू मार्केट परिसरात बुलडोझर फिरवत तोडफोड केली आणि टीएमसीच्या पक्ष कार्यालयांना देखील लक्ष केले असल्याचा आरोप टीएमसीने केला आहे.

न्यू मार्केट परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यालयाची तोडफोड केल्याचा व्हिडीओ टीएमसीकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. टीएमसीकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आह की, बुलडोझरच्या आसपास प्रचंड गर्दी झाली आहे. बुलडोझरच्या सहाय्याने न्यू मार्केट परिसरातील दुकाने तोडण्यात येत असल्याचे दिसत आहेत. यावेळी नागरिक जोरजोरात घोषणाबाजी करत आहेत. घटनास्थळी जोरजोरात गाणी वाजत आहेत आणि परिस्थिती खूपच तणावपूर्ण असल्याचे दिसत आहे.

टीएमसीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे की, निवडणुकीपूर्वी भाजप भीती संपली आणि विश्वासाला सुरुवात झाली आहे' असे म्हणत होते. पण आता परिस्थिती उलट झाली आहे. विश्वास संपला अन् बुलडोझर सुरू झाला. टीएमसीचा आरोप आहे की, भाजप समर्थकांच्या जमावाने न्यू मार्केट परिसरात तोडफोड केली. दुकानांचे नुकसान केले आणि टीएमसी पक्षाच्या कार्यालयावरही हल्ला केला. टीएमसीने या कारवाईला 'गुंडगिरी' म्हटलं आहे. भाजप ज्या बदल्याबद्दल बोलत होते तो हाच आहे असे टीएमसीने म्हटले आहे.

West Bengal: पश्चिम बंगालमध्ये राजकीय तणाव वाढला, भाजप कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यालयावर बुलडोझर फिरवल्याचा आरोप; VIDEO समोर
West Bengal Result: निकाल जाहीर होताच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उसळला, TMC चे कार्यालय जाळले; भाजपवर होतोय आरोप

टीएमसीने थेट आरोप केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आपल्या कार्यकर्त्यांना मनमानीने वागण्याची मुभा देत आहेत. जे रस्त्यावर उतरून मनमानी करत आहेत. त्याचसोबत टीएमसीने यावेळी पोलिसांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते फक्त शांतपणे हे सर्व पाहत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारी भाजपने काढलेल्या विजयी मिरवणुकीमध्ये रक्तरंजित थराराची घटना घडली. मिरवणुकीवेळी टीएमसी आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले होते. त्यानंतर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या केली होती.

West Bengal: पश्चिम बंगालमध्ये राजकीय तणाव वाढला, भाजप कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यालयावर बुलडोझर फिरवल्याचा आरोप; VIDEO समोर
West Bengal New CM: बंगालच्या गादीवर कोण बसणार? मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीवर मोठी अपडेट, तारीख आणि CM चं नाव आलं समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com