पश्चिम बंगाल जिंकणाऱ्या भाजपचा २ राज्यात दारूण पराभव, दोन आकडी संख्या गाठणेही कठीण

BJP election results : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय झाला पण २ राज्यात दारूण पराभवाचा सामना करावा लागला. जाणून घ्या ५ राज्यांच्या निवडणुकीत काय झालं?
PM Modi, Amit Shah
PM Modi, Amit Shah Saam Tv
Published On

Vidhan Sabha Election BJP performance : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. १५ वर्षानंतर पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाले असून भाजपने मोठ्या विजयाकडे वाटचाल केली आहे. भाजप तब्बल १९५ जागांवर आघाडीवर आहे, तर दुसरीकडे आसाममध्येही भाजपचा एकतर्फी विजय निश्चित झाला असून ९८ जागांवर आघाडी घेतली आहे. पद्दुचेरीमध्येही कमळ फुललेय. पण २ राज्यात मात्र भाजपचा दारूण पराभव झाला आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय. या दोन राज्यात नेमकं काय झालं? कुणाचं सरकार आले? भाजपला किती जागा मिळणार? हे जाणून घेऊयात..

थलापती विजयच्या वादळात भाजपसह सर्वांचाच सुपडासाफ

अभिनेता विजय यांनी अभिनयाला रामराम ठोकत राजकारणात एन्ट्री केली. पहिल्याच निवडणुकीत विजय यांना न भूतो न भविष्यति असे यश मिळाले. २३४ जागांपैकी विजय यांच्या टीव्हीकेनं ११२ जागांवर आघाडी घेतली. विजय यांच्या वादळात सत्ताधारी आणि विरोधक भूईसपाट झाले. भाजपचाही सुपडासाफ झाला. डीएमके ५० तर एआयडीएमकेला फक्त ५८ जागा मिळतील. तामिळनाडूमध्ये भाजपला खातेही उघडता आले नाही. एकही उमेदवार भाजपचा आघाडीवर नसल्याचे चित्र आहे.

PM Modi, Amit Shah
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला

केरळमध्ये डाव्यांचा गड कोसळला, काँग्रेस सत्तेत; भाजपचा पराभव

केरळमध्येही सत्तांतर झाले असून डाव्यांचा गड कोसळला आहे. काँग्रेस आघाडीने ९४ पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत सत्तास्थापनेकडे वाटचाल केली आहे. १४० जागांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त २ जागांवर यश मिळाले आहे. तर सत्ताधारी डाव्या आघाडीला फक्त ४० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

PM Modi, Amit Shah
West Bengal Results : पश्चिम बंगालचा निकाल बदलणार, ममता बॅनर्जींच्या दाव्याने राजकारणात खळबळ

पश्चिम बंगालमध्ये ममतांचा पराभव?

पश्चिम बंगालमध्ये १५ वर्षानंतर सत्तांतर होण्याची शक्यता आहे. २९४ जागांपैकी भाजप तब्बल १९३ जागांवर आघाडीवर आहे. तर ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी फक्त ९३ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसला बंगालमध्ये एकही जागा मिळालेली नाही.

आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेत

आसाममध्ये भाजपने १२६ पैकी ९८ जागांवर आघाडी घेतली असून पुन्हा सत्तेत येणार आहेत. तर काँग्रेसला फक्त २४ जागा मिळालया आहेत. पद्दुचेरीमध्येही कमळ फुलले असून ३० पैकी १६ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसला १० जागा मिळाल्या आहेत.

PM Modi, Amit Shah
Ladki Bahin Yojana : ₹३००० की ₹१५००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती पैसे येणार? मार्च-एप्रिलच्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com