Baramati bypoll result Sunetra Pawar vote margin details : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय आता निश्चित झाला आहे. पहिल्या फेरीपासून त्यांनी मोठी आघाडी घेतली होती. सुनेत्रा पवार अजितदादा यांचा बारामतीमधील विक्रम मोडीत काढणार का? याची चर्चा मतमोजणी सुरू झाल्यानंतरच झाली होती. अखेर १५ व्या फेरीचे आकडे समोर आल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांचा २०२४ मधील अजित पवार यांचा विक्रम मोडीत काढलाय. सुनेत्रा पवार यांनी १५ व्या फेरीनंतर १ लाख ३३ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. अद्याप ७ फेऱ्यांची मतमोजणी होणं बाकी आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडणूक येणाऱ्या उमेदवार ठरू शकतात.
पंधराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांना एक लाख ३२ हजार ९१६ इतके मताधिक्य मिळाले आहे. बारामतीमधील प्रतिस्पर्धी असलेल्या एकाही उमेदवाराला अद्याप १०० चा आकडाही गाठता आलेला नाही. अभिजित बिचुकले, करूणा मुंडे यांना अजून १०० ही मते मिळालेली नाही. त्यांचे डिपॉझिट जप्त होणार, हे निश्चित झालेय. अजित पवार यांच्या अकाली निधनाने बारामतीमध्ये पोटनिवडणूक झाली. बारमतीमध्ये ५५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. त्यामधील ९० टक्क्यांपेक्षा जास्त मते सुनेत्रा पवार यांनाच मिळतील, असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
बारामती पोटनिवडणुकीत २ लाख २३ हजार ७०५ मतदान झाले आहे. त्यामधील २ लाखांच्या आसपास मते सुनेत्रा पवारांना मिळू शकता. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात हा सर्वात मोठा विजय ठरू शकतो. दुपारी २.३० पर्यंत सर्व २३ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विजयानंतर मिरवणुका काढू नका, जल्लोष करू नका, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना केले आहे. बारामतीमध्ये गुलालाची उधळणसुद्धा कार्यकर्त्यांकडून होणार नाही.
बारामती विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत मतदानाची आकडेवारी
वर्ष: २०२४
मतदानाची टक्केवारी: ७१.८६ टक्के
विजयी उमेदवार: अजित पवार
विजयी मतं: १ लाख ८१ हजार १३२
मताधिक्य: १ लाख १ हजार
वर्ष: २०१९
मतदानाची टक्केवारी: ७० टक्के
विजयी उमेदवार: अजित पवार
विजयी मतं: १ लाख ९५ हजार ६४१
मताधिक्य: १ लाख ६५ हजार २६५
वर्ष: २०१४
मतदानाची टक्केवारी: ७३.६९
विजयी उमेदवार: अजित पवार
विजयी मतं: १ लाख ५० हजार ५८८
मताधिक्य: ८९ हजार ७९१
वर्ष २००९
मतदानाची टक्केवारी: ६८ टक्के
विजयी उमेदवार: अजित पवार
विजयी मतं: १ लाख २८ हजार ५४४
मताधिक्य: १ लाख २ हजार ७९७
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.