हिंसाचारानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच मणिपूरला गेले; राहुल गांधींनी टिकेची तोफ डागली

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदी ३ दिवसांच्या ५ राज्यांच्या दौऱ्यावर असून पहिल्या दिवशी ते मणिपूरात होते. मोदींनी ७,३०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले आणि रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.
Rahul Gandhi and PM narendra Modi
Rahul Gandhi and PM narendra Modisaam tv
Published On
Summary
  • पंतप्रधान मोदी ३ दिवसांच्या ५ राज्यांच्या दौऱ्यावर.

  • मणिपूरात ७,३०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन.

  • मिझोराम-आसाम-त्रिपुरा थेट दिल्ली रेल्वेने जोडले गेले.

  • काँग्रेस नेत्यांची मोदींच्या उशिराच्या दौऱ्यावर टीका.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारपासून ३ दिवस ५ राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्याच दिवशी पंतप्रधान मणिपूर दौऱ्यावर असून, जाळपोळीच्या घटनेनंतर ते प्रथमच मणिपुरात गेले होते. हिंसाचारानंतर मोदींनी मणिपूरला भेट दिली नव्हती. त्यांनी भेट द्यावी, अशी मागणी केली जात होती. मात्र, घटनेच्या काही महिन्यांनंतर विकासकामांच्यानिमित्ताने त्यांनी मणिपूरला भेट दिली. तसेच उपस्थितीतांना संबोधित केलं.

मोदी म्हणाले, 'मणिपूरच्या नावातच मणी आहे. आगामी काळात उत्तर पूर्व भारताची चमक वाढवणार आहे. सीमावर्ती राज्य असल्यानं इथे दळणवळणाची अडचण होते. ते मी जाणतो. २०१४ सालापासून या राज्याच्या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे. गावागावांत रस्ते तयार करण्यासाठी काम सुरू आहे. सध्या ८,७६८ कोटी रूपयांच्या रस्ते प्रकल्पांवर काम सुरू आहे',असं मोदी म्हणाले.

Rahul Gandhi and PM narendra Modi
रीलस्टार प्रतिक शिंदेच्या फॉर्च्युनरमुळे भीषण अपघात; तीन गाड्यांना धडक बसली, नेमकं काय घडलं?

आज चुराचांदपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ७,३०० कोटी रूपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी मणिपूरसह, मिझोराम, आसाम, पं बंगाल आणि बिहार या राज्यांना भेट देणार आहेत. मिझोराममधील आयझोल - दिल्ली राजधानी एक्स्प्रेससह इतर नव्या रेल्वे गाड्यांना त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. यामुळे नॉर्थ इस्टमधील हे ३ राज्य थेट दिल्लीशी जोडली गेली आहेत.

विरोधकांची टीका

दरम्यान, मोदींच्या मणिपूर दौऱ्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. 'मोदींचा दौरा चांगला आहे, पण खरा मुद्दा मत चोरीचा आहे'असं त्यांनी म्हटलं आहे. तर, प्रियंका गांधींनी मोदींना, याआधीच मणिपूरला यायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Rahul Gandhi and PM narendra Modi
वंशाच्या दिव्यासाठी आईनं पोटच्या २ महिन्यांच्या चिमुकलीला संपवलं; पाण्याच्या टाकीत बुडवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com