

औरैय्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट
माजी आमदारासह ११ जणांना जन्मठेप
सपाचे माजी आमदार कमलेश पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा
६ वर्षांनंतर कोर्टाने हा मोठा निकाल दिला
उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी आमदारासह ११ जणांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. औरैय्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात त्यांना जन्मठेप झाली आहे. ६ वर्षानंतर कोर्टाने या प्रकरणाचा निकाल सुनावला आहे. समाजवादी पार्टीचे माजी आमदार कमलेश पाठक, त्यांचा भाऊ संतोष पाठक यासह १० जणांना ही शिक्षा झाली आहे.
६ वर्षांपूर्वी औरैया जिल्ह्यातील प्रसिद्ध वकील मंजुल चौबे आणि त्यांची चुलत बहीण सुधा चौबे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांड प्रकरणाचा निकाल बुधवारी लागला. विशेष खासदार-आमदार न्यायालयाने या दुहेरी हत्याकांड प्रकरणात समाजवादी पार्टीचे माजी आमदार कमलेश पाठक आणि त्यांचे भाऊ संतोष पाठक यांच्यासह १० जणांना दोषी ठरवले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा खटला दीर्घकाळ चालला. आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन असून त्याचा खटला बाल न्याय मंडळासमोर प्रलंबित आहे. या शिक्षेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
हे हत्या प्रकरण औरैयामधील सर्वात गाजलेल्या गुन्हेगारी प्रकरणांपैकी एक आहे. या हत्याकांड प्रकरणाच्या तपासानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. जवळपास ६ वर्षे चाललेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी आणि बचाव पक्षाने आपापल्या बाजूने पुरावे आणि साक्षीदार सादर केले. त्यानंतर न्यायालयाने आज आपला निकाल दिला. कोर्टाने १० आरोपींना या हत्याप्रकरणात दोषी ठरवत त्यांना शिक्षा सुनावली. .
पोलिसांनी दिलेल्या माहिनुसार, ही घटना पंचमुखी हनुमान मंदिराजवळील जमिनीवरून झालेल्या वादातून घडली. याच जमिनीवरून कमलेश पाठक आणि वकील मंजुल चौबे यांच्यात मतभेद वाढत गेले होते. कमलेश पाठक आणि मंजुल चौबे हे एकेकाळी जिवलग मित्र होते . दोघेही राजकीय आणि सामाजिक कार्यात अनेकदा एकत्र दिसत असत पण कालांतराने त्यांच्यामध्ये जमिनीवर वाद सुरू झाला. यातूनच हे हत्यांकाड झालं.
पोलिसांनी दिलेल्या माहिनुसार, ही घटना पंचमुखी हनुमान मंदिराजवळील जमिनीवरून झालेल्या वादातून घडली. याच जमिनीवरून कमलेश पाठक आणि वकील मंजुल चौबे यांच्यात मतभेद वाढत गेले होते. कमलेश पाठक आणि मंजुल चौबे हे एकेकाळी जिवलग मित्र होते . दोघेही राजकीय आणि सामाजिक कार्यात अनेकदा एकत्र दिसत असत पण कालांतराने त्यांच्यामध्ये जमिनीवर वाद सुरू झाला. यातूनच हे हत्यांकाड झालं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.