वर्षभरापासून फरार असलेले घायवळ टोळीचे २ शार्पशूटर जेरबंद; गुन्हेगारी वर्तुळात खळबळ

Sachin Ghaywal Gang Members Arrested By LCB In Extortion Case: अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मकोका प्रकरणातील फरार आरोपी रोहित भोळेकर आणि ज्ञानेश्वर तोंडे यांना अटक केली आहे.
Ahilyanagar Local Crime Branch (LCB) team with the two arrested MCOCA accused, Rohit Bholekar and Dnyaneshwar Tonde, who belong to the notorious Sachin Ghaywal gang.
Ahilyanagar Local Crime Branch (LCB) team with the two arrested MCOCA accused, Rohit Bholekar and Dnyaneshwar Tonde, who belong to the notorious Sachin Ghaywal gang.Saam tv
Published On

सुशील थोरात, साम टीव्ही

मकोका सारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यामध्ये गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुख्यात सचिन घायवळ टोळीच्या दोन अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. खंडणीच्या गुन्ह्यात एक आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांनी दुसऱ्या आरोपीलाही बेड्या ठोकल्या. रोहित भोळेकर आणि ज्ञानेश्वर तोंडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

Ahilyanagar Local Crime Branch (LCB) team with the two arrested MCOCA accused, Rohit Bholekar and Dnyaneshwar Tonde, who belong to the notorious Sachin Ghaywal gang.
Operation Tiger : ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार? आदित्य ठाकरेंच्या विधानाने राजकीय खळबळ

एकाच्या मागावर असताना दूसराही जाळ्यात

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपीवर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी यांसारखे 'मकोका' अंतर्गतही कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून दोघेही फरार होते. दरम्यान आरोपी रोहित भोळेकर याच्याविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यातील खर्डा पोलीस ठाण्यात नुकताच एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रोहितच्या ठावठिकाण्याबाबत अत्यंत गोपनीय माहिती मिळाली.

Ahilyanagar Local Crime Branch (LCB) team with the two arrested MCOCA accused, Rohit Bholekar and Dnyaneshwar Tonde, who belong to the notorious Sachin Ghaywal gang.
Operation Tiger: उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत का गेले? बंडखोर खासदाराने सांगितलं कारण...

माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने सापळा रचून रोहित भोळेकर याला ताब्यात घेतले. मात्र, तो एकटा नसून त्याच्यासोबत ज्ञानेश्वर तोंडे हा दुसरा गुन्हेगारही उपस्थित होता. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता, दोघेही पुण्याच्या कुख्यात सचिन घायवळ टोळीचे सक्रिय सदस्य असल्याचे आणि मकोका लागल्यापासून वर्षभरापासून फरार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना संबंधित पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळजनक उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com