Operation Tiger: उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत का गेले? बंडखोर खासदाराने सांगितलं कारण...

Nagesh Patil Ashtikar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांचे विश्वासू खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पक्षाची साथ सोडत शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय का घेतला यामागचे कारण त्यांनी सांगितले....
Operation Tiger: उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत का गेले? बंडखोर खासदाराने सांगितलं कारण...
Uddhav Thackeray And Eknath ShindeSaam TV Marathi News
Published On
  • शिंदेंनी ऑपरेशन टायगरद्वारे ठाकरेंना धक्का दिला

  • ठाकरेंचे ६ खासदार फोडले

  • बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली

  • विकासकामांसाठी सत्ता गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरद्वारे उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे ६ विश्वासू खासदार फोडले. हे सर्व खासदार आपल्या मतदारसंघात गेले आहेत. यामधील बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेसोबत जाण्याचा निर्णय का घेतला यामागचे कारण सांगितले आहे. 'विकास कामासाठी सत्तेत जाणं गरजेचं आहे. कामं होत नसल्याने अनेकांनी पक्ष सोडला. सगळ्याच गोष्टींची आणि पदाधिकाऱ्यांचा विचार करून मी शिंदेसोबत गेलो.', असे आष्टीकरांनी सांगितलं.

नागेश पाटील आष्टीकरांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'आमच्यावर अविश्वास दाखवला तेव्हाच ठरवलं आता थांबून काही फायदा नाही. मी २ वर्षे निष्टेने काम करण्याचा प्रयत्न केला. काम होत नसल्याने शेवटी मी पाऊल उचललं. मी कुणावरही नाराज होऊन गेलो नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर तर अजिबात नाराज नाही. उद्धव ठाकरेंनी खूप प्रेम दिलं. संजय राऊत माझ्या वडिलांसारखे आहेत. संजय राऊत सारखे कोणी ही मोठी मंडळी बोलत असतील तर तो त्यांचा हक्क आहे. संजय राऊत यांनी देखील माझ्यावर खूप प्रेम केले. मी शिवसेनेतच गेलो आहे.'

Operation Tiger: उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत का गेले? बंडखोर खासदाराने सांगितलं कारण...
Operation Tiger : ठाकरेंचे 'ते' २ खासदार फुटायला तयारच नव्हते; दिग्गज नेत्यानं खेळला मास्टरस्ट्रोक अन् स्क्रिप्ट बदलली

'संजय राऊत हे माझ्या वडिलांसारखे आहेत. ते काहीही बोलले तरीही मला वाईट वाटणार नाही. पण हे सर्व करत असताना आम्ही १८ तारखेपर्यंत तरी कोणी कुठेच गेलो नव्हतो. पण ज्यापद्धतीचा अविश्वास किंवा बोलण्याचा अतिरेक झाला त्यानतंर बऱ्याच मंडळींनी विचार केला की आता इथे थांबून फार उपयोग होणार नाही. सर्वांना माहिती आहे की, सत्तेशिवाय कुठलीही कामे होत नाहीत.'

Operation Tiger: उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत का गेले? बंडखोर खासदाराने सांगितलं कारण...
'ऑपरेशन टायगर'चा पेपर मातोश्रीवर कसा फुटला? इनसाईड स्टोरी समोर; खासदाराच्या वडिलांचा सर्वात मोठा खुलासा

तसंच, 'माझ्या मतदारसंघात विकास कामे करावी लागतील. लोकांनी मला खूप मोठ्या आशेने निवडून दिलं आहे. मला त्यांची कामं करायची आहेत. कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नाही. प्रत्येकाला काही ना काही अपेक्षा आहेत. प्रत्येकाने मला काही ना काही आशेने निवडून दिले आहे. पण विकास कामं करण्यासाठी पैशांची गरज आहे आणि सत्तेशिवाय ही कामं करता येत नाहीत. त्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागलं. हेच यामागचं मोठं कारण आहे.', असे आष्टीकरांनी सांगितले.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत का गेले? बंडखोर खासदाराने सांगितलं कारण...
Operation Tiger : ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार? आदित्य ठाकरेंच्या विधानाने राजकीय खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com