Latur Crime: पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीला घेऊन आले अन्...; लातूरमध्ये खळबळ

Latur Police: लातूरमध्ये भयंकर घटना घडली. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अल्पवयीन मुलीचा वापर करण्यात आला. या घटनेमुळे लातूरमध्ये एकच खळबळ उडाली.
Latur Crime: पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीला घेऊन आले अन्...; लातूरमध्ये खळबळ
Latur CrimeSaam Tv
Published On
  • लातूरच्या उदगीरमध्ये पैशांचा पाऊस पाडण्याच्या विधीचा धक्कादायक प्रकार

  • पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचा कथित वापर

  • १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

  • उदगीर ग्रामीण पोलिसांची अंधश्रद्धेविरोधात मोठी कारवाई

संदीप भोसले, लातूर

पैशाचा पाऊस पाडण्याच्या विधीसाठी लक्ष्मीपूजेच आयोजन करून त्यासाठी अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा कथित प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार लातूरच्या उदगीरमध्ये उघडकीस आला आहे. उदगीर ग्रामीण पोलिसांनी हा डाव उधळून लावला. लातूर-उदगीर मार्गावरील करडखेल पाटीजवळ उदगीरपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध घालण्याबाबतच्या अधिनियमांतर्गत १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित आरोपी संगनमताने पैशाचा पाऊस पाडण्यासाठी लक्ष्मीपूजेचा विधी करण्याच्या तयारीत होते. या विधीसाठी आंध्र प्रदेशातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा कथित प्रयत्न असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर उदगीर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संबंधित प्रकार रोखल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात फुंडलीक देवराव रूपनर, सचिन साहेबराव भोंगळे, तसेच महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पुणे परिसरातील इतर संशयितांचा समावेश आहे.

Latur Crime: पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीला घेऊन आले अन्...; लातूरमध्ये खळबळ
Mumbai Crime: मुंबई हादरली! बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर नौदल कर्मचाऱ्याने संपवलं आयुष्य

काही संशयितांची पूर्ण नावे व पत्ते उपलब्ध नसल्याचेही पोलिसांच्या कागदपत्रात नमूद आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ५७७/२०२६ नोंदवण्यात आला असून, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या २०१३ च्या अधिनियमातील कलम ३(३), तसेच कलम १२ व १८ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. घटनेनंतर उदगीर ग्रामीण पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

Latur Crime: पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीला घेऊन आले अन्...; लातूरमध्ये खळबळ
Kalyan Crime: कल्याण हादरले! डोक्यावर वार करत तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह गोणीत भरून २४ तास पाण्यात ठेवला

या प्रकरणामागे नेमका कोणता अंधश्रद्धेचा प्रकार होता, अल्पवयीन मुलीला कोणत्या उद्देशाने आणण्यात आले होते आणि या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. अंधश्रद्धेच्या नावाखाली पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा कथित वापर करण्याचा प्रकार समोर आल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Latur Crime: पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीला घेऊन आले अन्...; लातूरमध्ये खळबळ
Crime: २ पत्नी असल्याचं कळालं, बॉयफ्रेंडने प्रग्नेंट गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर मृतदेह दुसऱ्या राज्यात नेऊन पूरला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com