Titwala : कोहळा, टाचण्या टोचलेलं लिंबू अन् कोंबडीचे पाय...; भाडेकरूच्या घराबाहेर जादूटोणा, टिटवाळ्यातील भयंकर प्रकार

Titwala News : टिटवाळ्यातील गजानन पॅलेस सोसायटीमध्ये भाडेकरूच्या घरासमोर कोहळा, लिंबू, कोंबडीचे पाय आणि टाचण्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनसेने पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.
TITWALA SHOCKER: SUSPICIOUS OBJECTS FOUND OUTSIDE TENANT'S FLAT, MNS SEEKS POLICE PROBE
TITWALA SHOCKER: SUSPICIOUS OBJECTS FOUND OUTSIDE TENANT'S FLAT, MNS SEEKS POLICE PROBESaam Tv
Published On
Summary
  • टिटवाळ्यात भाडेकरूच्या घरासमोर संशयास्पद वस्तू आढळल्या

  • कोहळा, लिंबू, कोंबडीचे पाय आणि टाचण्या ठेवून अज्ञात व्यक्ती पसार

  • सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पद हालचाली कैद

  • मनसेने या घटनेची दखल घेत पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी केली

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

टिटवाळ्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गजानन पॅलेस सोसायटीमध्ये एका भाडेकरूच्या घरासमोर संशयास्पद वस्तू आढळून आल्या आहेत. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी मनसेने दखल घेत सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन पॅलेस सोसायटीच्या ए-विंगमधील एका फ्लॅटच्या दरवाजासमोर अज्ञात व्यक्तीने कोहळा, लिंबू, कोंबडीचे पाय आणि त्यामध्ये चार टाचण्या ठेवून तेथून निघून गेल्याचे आढळून आले. ही घटना संशयास्पद वाटत असल्याने संबंधित भाडेकरूने याबाबत सोसायटी आणि स्थानिक नागरिकांना माहिती दिली.

TITWALA SHOCKER: SUSPICIOUS OBJECTS FOUND OUTSIDE TENANT'S FLAT, MNS SEEKS POLICE PROBE
Health Care Tips : महिनाभर रात्रीचे जेवण टाळले, तर शरीरात नेमके कोणते बदल होतात?

घटनेनंतर सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एक अज्ञात व्यक्ती संबंधित घरासमोर ही वस्तू ठेवताना दिसून आली आहे. मात्र, फुटेजमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे या प्रकारामागे नेमका कोणाचा हात आहे? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

TITWALA SHOCKER: SUSPICIOUS OBJECTS FOUND OUTSIDE TENANT'S FLAT, MNS SEEKS POLICE PROBE
Healthy Food : ब्राऊन की व्हाईट, कोणता ब्रेड शरीराला हानिकारक? वेळीच सावध व्हा नाहीतर...

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेत पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन या प्रकरणामागील सत्य समोर आणावे, तसेच परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com