

पीएम मोदी आज देशाला संबोधित करणार
रात्री साडेआठ वाजता ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर महत्त्वाचं संबोधन
पीएम मोदी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला. हे विधेयक मंजूर न झाल्यामुळे मोदी सरकारच्या चांगलेच जिव्हारी लागले. यामुळे एनडीए आक्रमक झाले असून विरोधकांच्या विरोधात देशभरामध्ये आंदोलनं केली जात आहेत. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री साडेआठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ते नेमकी काय घोषणा करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
नारीशक्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर पीए मोदी देशाशी संवाद साधणार असल्यामुळे ते काय बोलणार हे पाहणं महत्वाचे राहिल. यावेळी पीएम मोदी अनेक मुद्द्यांवर लक्ष केंदित करण्याची शक्यता आहे. ते काय बोलणार याकडे फक्त सर्वसामान्यच नाही तर राजकीय नेत्यांचे देखील लक्ष लागले आहे. पीएम मोदी देशाला संबोधित अशावेळी करत आहेत जेव्हा देशात आणि जगात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी वेगाने घडत आहेत.
पीएम मोदी देशातील सद्यस्थिती, सरकारची धोरणे आणि भविष्यातील योजनांवर चर्चा करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. संबोधनाच्या विषयासंबंधी अद्याप कोणताही अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. आतापर्यंत पीएम मोदी वेळोवेळी देशाला संबोधित करत आले आहेत आणि यामध्ये अनेकदा महत्त्वाचे निर्णय किंवा मोठ्या घोषणांचा समावेश असतो. पण आजचे त्यांचे संबोधन हे महत्वाचे मानले जात आहे.
दरम्यान, २०२९ च्या निवडणुकीसाठी मास्टरस्ट्रोक समजल्या जाणारे महिला आरक्षण विधेयक शुक्रवारी लोकसभेत नामंजूर झाल्यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला. मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच असे घडलं त्यामुळे हे मोदींच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात पहिल्यांदाच सरकार एखादे विधेयक सभागृहात मंजूर करू शकले नाही. विधेयक मंजूर होऊ न शकल्यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झालयाचे शुक्रवारी पाहायला मिळाले. त्यानंतर एनडीएने महत्वाची बैठक बोलावली होती. देशव्यापी आंदोलनाचाही इशारा दिला होता. त्यानुसार आज देशभरामध्ये विरोधी नेत्यांच्या घराबाहेर आंदोलनं सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.