

महिला आरक्षण विधेयकावरून ठाकरे गटात मतभेद
संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका, प्रियंका चतुर्वेदींकडून विधेयकाला समर्थन
ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर ठाकरे गटातच फूट पडली आहे. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक पडलं. विधेयक पडल्यानंतर सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. या विधेयकावरून ठाकरे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. विधेयक पडल्यानंतर ठाकरे गटाच्या माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी दु:ख व्यक्त केलं. तर संजत राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
सत्ताधाऱ्यांनी लोकसभेत ३ विधेयक मांडले. लोकसभेत १३१ वी घटनादुरुस्ती विधेयक दोन तृतियांश मतांची गरज होती. बिलासाठी एकूण ५२८ खासदारांनी मतदान केलं. या बिलाच्या विरोधात २३० मते पडले. विधेयक पडल्यानंतर सत्ताधारी भाजपच्या महिला खासदारांनी आंदोलन केलं. तर पक्षाने १८ एप्रिल रोजी राष्ट्रव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली.
विधेयक पडल्यानंतर ठाकरे गटाच्या माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी दु:ख व्यक्त केलंय. भारतीय महिलांसाठी दु:खाचा दिवस आहे. महिलांना संसद किंवा विधानसभेत स्वत:चे स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती'.
दुसरीकडे खासदार संजय राऊत म्हणाले की, 'महिला आरक्षण विधेयक हे एक राजकीय षडयंत्र होतं. ते कोसळलं. मोदी आणि त्यांच्या मंडळाच्या घसरणीची ही सुरुवात आहे. महिला आरक्षण नावाखाली मतदारसंघांची हवी तशी मोडतोड करून त्याना सर्व निवडणुका जिंकायच्या होत्या. ते मनसुबे संसदेत कोलमडून पडलेत. ते मनमर्जीने लोकसभेच्या जागा तर वाढवू शकले नाहीत'.
'सत्ताधाऱ्यांना संविधानाची ताकद आणि स्वतःची खरी कुवत समजून गेली आहे. फक्त १६ खासदारांच्या बहुमतावर प्रधानमंत्री पद टिकले आहे. १६ कमी झाले, तर झोला घेऊन बाहेर पडावे लागेल. हाच आजच्या घडामोडींचा अर्थ आहे. मोदी लवकरच जात आहेत. लिहून ठेवा. राहुल गांधी यांनी १६ चा फास फेकला आहे .१६ …१६! थांबा आणि वाट पाहा, असे राऊत पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.