पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली तातडीची बैठक; दिल्लीत घडामोडींना वेग

Narendra Modi CCS Meeting Latest News: अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत तातडीची सीसीएस बैठक बोलावली आहे.
Prime Minister Narendra Modi chairs an emergency security review meeting in New Delhi amid escalating Iran–Israel tensions.
Prime Minister Narendra Modi chairs an emergency security review meeting in New Delhi amid escalating Iran–Israel tensions.Saam Tv
Published On

अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे जगभरात खळबळ माजली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी रात्री दिल्लीत परतल्यानंतर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (सीसीएस) ची बैठक बोलावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांच्या तामिळनाडू राज्याच्या दौऱ्यानंतर ते रात्री ९:३० च्या सुमारास दिल्लीत पोहोचतील. पंतप्रधान मोदी काही प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी तमिळनाडूमध्ये होते. या बैठकीत इराणमधील घडामोडी, युएई आणि मध्य पूर्वेच्या इतर भागात अडकलेल्या भारतीयांची परिस्थिती आणि संबंधित घडामोडींवरचरकहाा केली जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी यांनी २५-२६ फेब्रुवारी रोजी इस्रायलला भेट दिली होती. ही भेट उत्साहवर्धक आणि सकारात्मक होती. दोन्ही देशांनी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे वचन दिले. या भेटीदरम्यान, दोन्ही देशांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण, शेती, ऊर्जा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यासारख्या क्षेत्रांचा समावेश असलेल्या १६ करारांवर स्वाक्षरी केली.

Prime Minister Narendra Modi chairs an emergency security review meeting in New Delhi amid escalating Iran–Israel tensions.
महत्वाची बातमी! होळीनंतर निवडणुकीचे बिगुल वाजणार; संभाव्य तारखा आल्या समोर

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की इराण-इस्रायल अमेरिकामध्ये जे तणाव निर्माण झाले त्यावर चिंता व्यक्त केली. त्यात असेही म्हटले आहे की, तणाव कमी करण्यासाठी आणि अंतर्गत समस्या सोडवण्यासाठी संवाद आणि डिप्लोमेसीचा वापर केला पाहिजे आणि सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे.

Prime Minister Narendra Modi chairs an emergency security review meeting in New Delhi amid escalating Iran–Israel tensions.
Iran Attack: भारतीय कर्मचारी असलेल्या तेल टँकरवर इराणचा हल्ला; होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मार्गातील जहाज रडारवर

अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणे ही प्राथमिकता

तेहरान, तेल अवीव, अबू धाबी आणि दमास्कस येथील भारतीय दूतावासांनी २८ फेब्रुवारी रोजी सूचना जारी केल्या, ज्यामध्ये भारतीय नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्यास, प्रवासाची कागदपत्रे तयार ठेवण्यास, MADAD पोर्टलवर नोंदणी करण्यास आणि स्थानिक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले.

Prime Minister Narendra Modi chairs an emergency security review meeting in New Delhi amid escalating Iran–Israel tensions.
Pakistan: खोमेनेईंच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये हिंसक आंदोलन, अमेरिकेच्या दुतावासाची तोडफोड; ९ जणांचा मृत्यू

भारताने इराण, इस्रायल, जॉर्डन, कतार, युएई आणि पॅलेस्टाईनमधील आपल्या नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. हवाई क्षेत्र बंद आणि धोकादायक असल्याने या प्रदेशातील कोणत्याही देशातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचा नवी दिल्ली तात्काळ विचार करत नाही. इराणमध्ये अंदाजे १०,००० भारतीय नागरिक राहतात आणि काम करतात, तर पश्चिम आशिया/मध्य पूर्व प्रदेशात ही संख्या अंदाजे 90 लाख आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सांगितले की, या प्रदेशातील भारतीय मिशन नागरिकांशी सतत संपर्कात आहेत आणि हेल्पलाइन जारी करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com