PM Narendra Modi : "आपण करून दाखवू...." २०४७ पर्यंत भारताला विकसित देश घडवण्याचे स्वप्न; पंतप्रधान मोदींची नवीन घोषणा

PM Narendra Modi 25 Years Complete : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाली. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदापासून पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास आणि २०४७ पर्यंत विकसित, आत्मनिर्भर भारताचे मोदींचे व्हिजन.
Narendra Modi 25 years Complete Political Career
Narendra Modi 25 years Complete Political Career Saam tv
Published On: 
Summary
  • नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासाला २५ वर्षे पूर्ण

  • २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य

  • विरोधक आणि टीकाकारांनी लोकशाहीची ताकद समजून घेण्यास मदत केली - नरेंद्र मोदी

  • ऑलिम्पिक आणि अंतराळ क्षेत्रावर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ७ ऑक्टोबर २००१ रोजी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आपल्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा सुरू केला. त्यानंतर मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा त्यांचा प्रवास झाला. या २५ वर्षांच्या राजकीय वाटचालीच्या निमित्ताने आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कर्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी २०४७ पर्यंत भारत विकसित देश म्हणून पाहता येणार असल्याचे म्हटले.

२०४७ पर्यंत भारत विकसित देश

पंतप्रधान मोदींच्या राजकीय प्रवासातील २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 'विकसित भारत संकल्प सभा' आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मोदी यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाला उजाळा दिला. यावेळी त्यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्याचा संकल्प व्यक्त केला. “२०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवायचे आहे आणि आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य पूर्ण करायचे आहे. ये हम करके दिखाएंगे,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Narendra Modi 25 years Complete Political Career
Lemon Juice Tricks : कितीही पिळला तरी लिंबातून कमी रस मिळतो? घरच्या घरी 'या' 6 सोप्या ट्रिक्स करून पाहा

पंतप्रधानांनी विरोधकांचे मानले आभार

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या राजकीय विरोधकांचाही उल्लेख केला. आपल्या विरोधात भूमिका घेणाऱ्या लोकांकडूनही आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. “ज्यांनी माझा विरोध केला, त्यांनी मला लोकशाहीची ताकद शिकवली,” असे मोदी म्हणाले. विरोधक आणि टीकाकारांमुळे आपल्या कामाचा आणि निर्णयांचा पुनर्विचार करण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या विशेष प्रसंगी पंतप्रधानांनी भारताच्या भविष्यासंदर्भातील आपले ध्येयही सांगितले. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासोबतच भारताने ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवावे आणि अंतराळ क्षेत्रात प्रगती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Narendra Modi 25 years Complete Political Career
Gold Ring : हातांचे सौंदर्य वाढवतील सोन्याच्या अंगठ्यांचे 'हे' ५ ट्रेंडी डिझाईन्स; पाहा लेटेस्ट कलेक्शन

जनता देवस्वरूप आहे

आपल्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनाबद्दल बोलताना मोदी यांनी जनतेच्या विश्वासाला महत्त्व दिले. “आज मी जो काही आहे आणि ज्या जबाबदारीवर आहे, तो जनतेमुळे आहे. माझ्यासाठी जनता देवस्वरूप आहे,” असे त्यांनी म्हटले. देशाने आपल्याला खूप काही दिले असून त्यामुळे देशाप्रती आपली जबाबदारीही मोठी असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देशवासीयांची सेवा हीच आपली सर्वात मोठी जबाबदारी असून, देशासाठी अधिक मेहनत करण्याची आणि दिवस-रात्र जनतेची सेवा करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com