PM मोदींना झालमुडी देणाऱ्या विक्रेत्याला धमक्या; PAK आणि बांग्लादेशमधून फोन कॉल्स, मोदींसोबतचा क्षण ठरला डोकेदुखी?

Jhalmuri Vendor Threatened After Meeting PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींना झालमुडी खाऊ घालणाऱ्या पश्चिम बंगालमधील विक्रेत्याला पाकिस्तान आणि बांगलादेशमधून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jhalmuri vendor Bikram Sau, who served Prime Minister Narendra Modi, now faces alleged death threats from international callers.
Jhalmuri vendor Bikram Sau, who served Prime Minister Narendra Modi, now faces alleged death threats from international callers.saam tv
Published On

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'झालमुडी' खाऊ घालणारे स्थानिक दुकानदार बिक्रम साऊ यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. आता या दुकानदाराला आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून जीवे मारण्याचे फोन येत आहेत. हे फोन पाकिस्तान आणि बांगलादेशमधून येत असल्याचे सांगितले जात आहे. जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर संपूर्ण कुटुंब भीतीच्या सावटेत आहे. पंतप्रधान मोदींना स्वतःच्या हाताने बनवलेली झालमुडी खाऊ घातल्यानंतर बिक्रम साऊ यांना सोशल मीडियावर अवघ्या काही तासात प्रसिद्धी मिळायला लागली. पण हीच प्रसिद्धी आता त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी भीतीचे कारण बनली आहे.

Jhalmuri vendor Bikram Sau, who served Prime Minister Narendra Modi, now faces alleged death threats from international callers.
Death Threat : "अमेरिकेतही सोडणार नाही..."; कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापक दीपकेंना जीवे मारण्याची धमकी, सोशल मीडियावर खळबळ

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झाडग्राममध्ये सभा पार पडली होती. सभेनंतर पंतप्रधान मोदींचा ताफा परत येत असताना, ते अचानक झालमुडी येथील विक्रेते विक्रम साव यांच्या रस्त्यावरील दुकानाजवळ थांबले. त्या दुकानदाराने झालमुडी तयार करून पंतप्रधान मोदींना दिली.

Jhalmuri vendor Bikram Sau, who served Prime Minister Narendra Modi, now faces alleged death threats from international callers.
NEET Paper Leak : नीट पेपर फुटीप्रकरणी CBI ची पुण्यात मोठी कारवाई; प्राध्यापिकेला अटक

यावेळी पंतप्रधान मोदींनी दुकानदाराशी संवाद साधला. पंतप्रधानांनी या घटनेचा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला, जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आणि झालमुरीची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली.

Jhalmuri vendor Bikram Sau, who served Prime Minister Narendra Modi, now faces alleged death threats from international callers.
26 राज्यसभा जागांसाठी निवडणुकीची घोषणा; वाचा संपूर्ण वेळापत्रक

पाकिस्तान आणि बांगलादेशकडून धमक्या

स्थानिक दुकानदार बिक्रम सॉ यांचा आरोप आहे की, ही अचानक मिळालेली प्रसिद्धी आता त्रासाचे कारण बनली आहे. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मोबाईलवर पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या देशांतील आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून सतत फोन आणि व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल्स येत आहेत. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या आणि गंभीर परिणामांच्या धमक्या मिळत आहेत. बिक्रमने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून आलेल्या धमक्यांमुळे परिसरात चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com